पुढारी ऑनलाईन : सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या आरोपीवर धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे आज (दि.६ जून) घडली, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकेश खटल्याच्या सुनावणीसाठी चेंगलपट्टू न्यायालयात (Tamil Nadu) आणण्यात आले हाेते. लोकेश रस्त्याच्या कडेला असलेल्या ज्यूसच्या दुकानाजवळ थांबला होता. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीवर आले. देशी बनावटीचा बॉम्ब लोकेशवर फेकला. त्यानंतर या टोळीने आरोपी लोकेश यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली.
या घटनेत इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहितीची मिळताच, न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र हल्लेखाेर घटनास्थळावरुन पसार झाले हाेते. दरम्यान आरोपी लोकेश याची हत्याही पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा संशय आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आरोपींचा शोध सूरु असून, सीसीटीव्ही फुटेजही (Tamil Nadu) तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.