Tamil Nadu elections 2026 | तामिळनाडूत द्रमुक १६४ जागा लढविणार, काँग्रेसच्‍या वाट्याला किती जागा आल्‍या?

Tamil Nadu elections 2026 | मुख्‍यमंत्री स्टालिन यांनी केली जागा वाटपचा घोषणा, मित्रपक्षांना सोडल्‍या ७० जागा
Tamil Nadu elections 2026
मुख्यमंत्री एम.के. स्टालिन.File Photo.
Published on
Updated on

Tamil Nadu elections 2026

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आघाडीने आपले जागावाटप जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी आज (दि. २८) जागावाटपाचा तपशील आणि पक्षाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. एकूण २३४ मतदारसंघांपैकी DMK स्वतः १६४ जागांवर निवडणूक लढवणार असून, उर्वरित ७० जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्‍या वाट्याला २८ जागा

जागावाटपाची घोषणा करताना मुख्यमंत्री स्टालिन यांनी स्पष्ट केले की, आघाडी निश्चित करण्यास झालेला वेळ हा मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आवश्यक होता, जेणेकरून सर्वांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस २८ जागा, 'देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम' (DMK) ला १० जागा, 'विदुथलाई चिरुथाईगल कच्ची' (VCK) ला ८, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (CPI) ५, माकपला (CPI-M) ५ आणि MDMK ला ४ जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा लहान पक्षांना वाटून देण्यात आल्या आहेत.

स्‍टॅलिन पुन्‍हा कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार

जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार, मुख्यमंत्री एम.के. स्टालिन कोलाथूर मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावणार आहेत. तर उपमुख्यमंत्री उधयनिधी स्टालिन यांना चेपॉक-तिरुवल्लिकेनी (ट्रिप्लिकेन) मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, मंत्री सेंथिल बालाजी यांना करूरऐवजी कोईम्बतूर दक्षिण या महत्त्वाच्या शहरी मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले आहे. मदुराई सेंट्रल, तिरुची वेस्ट आणि मन्नारगुडी यांसारख्या हाय-प्रोफाइल जागांवर विद्यमान मंत्री पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

Tamil Nadu elections 2026
Tamil Nadu Assembly Election | तामिळनाडूत 'अण्णाद्रमुक'च मोठा भाऊ, भाजप २३४ पैकी केवळ २७ जागांवर निवडणूक लढविणार!

काही मतदारसंघात काँग्रेस -भाजपमध्‍ये होणार थेट लढत

काँग्रेसच्या कोट्यात गेलेल्या जागांमध्ये वेलाचेरी, इरोड पूर्व आणि उदगमंडलम (उटी) यांचा समावेश आहे. उटीमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. यासोबतच श्रीपेरुंबुदूर, कडलूर आणि कन्याकुमारी भागातील महत्त्वाचे मतदारसंघही काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. डाव्या पक्षांनी तिरुपूर आणि पलानी सारखे मोक्याचे मतदारसंघ मिळवले आहेत, तर VCK आणि MDMK अनुक्रमे कट्टुमन्नारकोविल आणि मदुराई दक्षिणमधून निवडणूक लढवतील.

Tamil Nadu elections 2026
West Bengal election 2026 | ममता बॅनर्जींना धक्का..! निवडणूक आयोगाने प. बंगालच्‍या पोलीस महासंचालकांसह मुख्य सचिवांना हटवले

दम्रुकने ६० नव्‍या चेहर्‍यांना दिली संधी

DMK च्या १६४ उमेदवारांच्या यादीत अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल राखण्यात आला आहे. या यादीत ६० हून अधिक उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये २९ वकील, १७ अभियंता, १५ डॉक्टर आणि ७ पीएचडी धारकांचा समावेश असून १८ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Tamil Nadu elections 2026
Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!

द्रमुक-अण्‍णाद्रमुकमध्‍ये मुख्‍य लढत

राज्यात DMK आघाडीचा मुकाबला एआयएडीएमके (AIADMK) च्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीशी होईल. एनडीएच्या करारानुसार AIADMK १६९ जागांवर, तर भाजप २७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तामिळनाडूच्या २३४ विधानसभा जागांसाठी २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, पुद्दुचेरीमध्ये ९ एप्रिलला मतदान होईल. या दोन्ही निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news