West Bengal election 2026 | ममता बॅनर्जींना धक्का..! निवडणूक आयोगाने प. बंगालच्‍या पोलीस महासंचालकांसह मुख्य सचिवांना हटवले

West Bengal election 2026 |कोलकाता पोलीस आयुक्तांचीही बदली, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली नवीन नियुक्ती
West Bengal election 2026
पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी. File Photo.
Published on
Updated on

West Bengal election 2026

कोलकाता: विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या पोलीस दल आणि प्रशासकीय नेतृत्वात मोठा फेरबदल करण्यात आला असून, निवडणूक आयोगाने विद्यमान पोलीस महासंचालक (DGP) आणि मुख्य सचिवांना पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.वरिष्ठ अधिकारी दुष्यंत नारियाला हे नंदिनी चक्रवर्ती यांच्या जागी नवीन 'मुख्य सचिव' म्हणून कार्यभार स्वीकारतील, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी सिद्ध नाथ गुप्ता यांची पीयूष पांडे यांच्या जागी 'पोलीस महासंचालक' (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची उचलबांगडी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यामध्ये १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सिद्ध नाथ गुप्ता यांची पश्चिम बंगालचे प्रभारी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, १९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी नटराजन रमेश बाबू यांची सुधार सेवा महासंचालक म्हणून, तर १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय मुकुंद रानडे यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (ADG & IGP - कायदा आणि सुव्यवस्था) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. यासोबतच, कोलकाता पोलीस आयुक्तपदी १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय कुमार नंद यांची नियुक्ती झाली आहे.

West Bengal election 2026
Assembly Elections 2026 |पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! प. बंगालमध्‍ये दोन टप्‍प्‍यात मतदान

तातडीने अंमलबजावणीचे आदेश

निवडणूक आयोगाने हे आदेश तात्काळ लागू करण्यास सांगितले असून, नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी रुजू झाल्याचा अहवाल १६ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुकीशी संबंधित कोणतेही पद दिले जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतरच हे बदल करण्यात आले आहेत.

West Bengal election 2026
West Bengal Election 2026 | गेल्या वेळेस ८ टप्प्यांत झालेली पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक यंदा फक्त २ टप्प्यांतच का?

प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल

पोलीस दलासोबतच निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. संघमित्रा घोष यांची गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती. त्यांनी २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी जगदीश प्रसाद मीना यांची जागा घेतली आहे. या सर्व बदल्यांची अंमलबजावणी सोमवार, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

West Bengal election 2026
Vinod Tawde comeback : विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात, ‘श्रद्धा आणि सबुरी’ला मिळाले फळ!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. राज्यात २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news