Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!

एका राज्यातील उपमुख्यमंत्री मध्यस्थाची भूमिकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
Published on
Updated on

Tamil Nadu Politics

चेन्‍नई : तामिळनाडू विधानसभा निवडणूक आज (दि. १५) जाहीर होणार आहे. तत्‍पूर्वी राज्यातील सत्तेत आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपने अभिनेता विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाला युतीची खुली ऑफर दिली आहे. आता अभिनेता विजय भाजपची ऑफर स्‍वीकारणार का, याकडे राज्‍यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

८० जागा आणि उपमुख्यमंत्रीपद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने विजय यांच्यासमोर उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाने युतीअंतर्गत TVK ला ८० जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. विजय यांचा मोठा चाहतावर्ग 'एनडीए'च्या (NDA) बाजूने वळल्यास राज्यातील निवडणूक निकाल पूर्णपणे बदलू शकतात, असा भाजप ज्‍येष्‍ठांचा विश्वास आहे.

Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
Vijay controversy |'विजयने आधी अभिनेत्री त्रिशाच्या घरातून बाहेर पडावं'; भाजप नेत्याच्या विधानाने तामिळनाडूतील राजकारण तापले

विजय यांची राज्‍यात प्रचंड लोकप्रियता

तामिळनाडूतील चुरशीच्या लढतीत केवळ २ टक्के मतांचा फरकही जय-पराजयाचे गणित बदलू शकतो. विजय यांची प्रचंड लोकप्रियता पाहता, त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी एका दुसऱ्या राज्यातील उपमुख्यमंत्री मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. ते विजय यांच्याशी संवाद साधत आहेत. भाजपने जरी उपमुख्यमंत्रीपद आणि ८० जागांची ऑफर दिली असली, अभिनेता विजय यांचे लक्ष मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, विजय यांना आपल्या पहिल्याच निवडणुकीत मुख्य भूमिकेत राहायचे आहे, जो सध्याच्या चर्चेतील अडथळा ठरत आहे.

Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
Tamil politics: तमिळी राजकारणाचा ‌‘तिसरा कोन‌’

विजय यांच्‍या निकवटर्तींना युतीबाबत काही शंका

विजय यांच्या जवळच्या सल्लागारांमध्ये या युतीबाबत काही शंका आहेत. विजय यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात एक 'तिसरा पर्याय' आणि स्वतंत्र शक्ती म्हणून केली आहे. इतक्या लवकर एखाद्या राष्ट्रीय आघाडीचा (NDA) भाग बनल्यास त्यांच्या 'वेगळ्या राजकारणाची' प्रतिमा मलीन होऊ शकते, असे त्यांच्या सल्लागारांचे मत आहे.

Tamil Nadu Politics | तामिळनाडूत भाजपची मोठी खेळी; अभिनेता विजयला ८० जागांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
Tamil Nadu Governor vs Government | तामिळनाडू विधानसभेत पुन्हा राज्यपाल-सरकार संघर्ष! नेमकं काय घडलं?

तामिळनाडूच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

अभिनेता विजय आणि भाजपमध्‍ये युती झाली तर राज्यातील मुख्य लढत तिरंगी किंवा एका नवीन ध्रुवीकरणाकडे वळू शकते. आतापर्यंत तामिळनाडूचे राजकारण द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) यांच्याभोवतीच फिरत राहिले आहे. विजय आणि भाजप एकत्र येणे या दोन्ही प्रस्थापित प्रादेशिक पक्षांसमोर मोठे आव्हान उभे करू शकते, असे विश्‍वास राजकीय विश्लेषक व्‍यक्‍त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news