Swati Maliwal assault case | स्वाती मालीवाल प्रकरण: केजरीवालांच्या घरातील CCTV, डीव्हीआर जप्त

Swati Maliwal assault case
Swati Maliwal assault case

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला आहे. आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. दरम्‍यान, या प्रकरणी केजरीवाल यांचे खासगी पीए बिभव कुमार (Swati Maliwal assault case) यांना शनिवारी (दि.१९) रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रिंटर आणि लॅपटॉप देखील उचलून नेले

मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी अंजिता चेप्याला, एसएचओ सिव्हिल लाइन्ससह दिल्ली पोलिसांचे एक पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी येथील सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेतला (Swati Maliwal assault case) आहे. तसेच प्रिंटर आणि लॅपटॉप देखील उचवलून नेल्याचे समजत आहेत.

घटनेच्या वेळचे फुटेज अद्याप मिळाले नाहीत

या प्रकरणात काल (दि.१८ मे) पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. परंतु घटनेच्या वेळेचे फुटेज त्यांना मिळालेले नाहीत. तसेच बिभव (Swati Maliwal assault case) तपासात देखील सहकार्य करत नाहीत. त्यामुळेच कारावाई करण्यात आल्याचे दिल्‍ली पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

बिभव कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा आरोप

मालीवाल मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी बिभव कुमार यांना शनिवारी (दि.१८ मे) अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान,  दिल्ली पोलिसांकडून हजर असलेले अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी बिभव कुमारच्या कोठडीबाबत युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'आम्ही डीव्हीआर मागितला होता, तो पेन ड्राईव्हमध्ये देण्यात आला होता. फुटेज रिक्त आढळले. आयफोन पोलिसांना दिला आहे, मात्र आता संशयित आरोपी बिभव कुमार पासवर्ड सांगत नाही. फोन फॉरमॅट झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये फेरफार केल्याचा दिल्ली पोलिसांचा संशय

"आरोपी घटनास्थळी हजर होता. सीसीटीव्हीमध्ये फेरफार झाल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे".

हेही  वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news