

Swami Chaitanyananda Saraswati :
दिल्ली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा माजी प्रमुख स्वामी चैतन्यानंद याला दिल्ली पोलिसांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस खोलात जाऊन तपास करत आहेत. याचदरम्यान स्वामी चौतन्यानंद सरस्वतीचे एक एक काळे कारनामे उजेडात येत आहेत. नुकतेच एक व्हॉट्स अॅप चॅट्स लीक झाले आहेत. हे चॅट स्वामी चैतन्यानंद एका महिलेचे असल्याचा दावा केला जात आहे. या चॅटवरून हा चैतन्यानंद सतत तरूण मुलींच्या शोधात होता. त्यानं दुबईच्या शेखला देखील एक महिला पुरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.
इंडिया टुडेच्या हाती चैतन्यानंदचे काही लीक चॅट्स हाती लागले आहेत. स्वामी चैतन्यानंद हा दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्चचा संचालक होता. त्यावेळी त्यानं हे सर्व कांड केले असल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.
या चॅटनुसार, चैतन्यानंद महिलेला, 'गुड इव्हिनिंग माय स्वीट बेबी डॉल डॉटर.' असा मेसेज केला होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनीनं इथं दुपार आहे सर.. तुम्ही काही खाल्लं आहे का असा रिप्लाय दिला होता.
दुसऱ्या एका लीक मॅसेजमध्ये चैतन्यानंद म्हणतात, 'स्वीट बेबी डॉटर डॉल बेबी, कुठं आहेस माझ्यावर का रागावली आहेस बेबी असा मेसेज पाठवला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीनं मी झोपायला जात आहे उद्या कॉल करते असं सांगितलं. त्यावर हा चैतन्यानंद म्हणतो. तू माझ्यासोबत झोपली नाहीस, गूड नाईट तू माझ्यासोबत झोपणार नाहीस का बोल ना? असा रिप्लाय दिला.
दुसऱ्या एका लीक चॅटमध्ये विद्यार्थिनीला म्हणतो मी डिस्को डान्स करतोयत तू माझ्यासोबत डान्स करणार का? त्यानंतर विषयांतर करत तो म्हणतो, 'दुबईतील शेख सेक्स पार्टनरच्या शोधात आहे. तुझी कोण चांगली मैत्रीण आहे का? ज्यावेळी ती विद्यार्थिनी नाही असं म्हणते त्यावेळी हा नराधम चैतन्यानंद कसं शक्य आहे? बघ एखादी वर्गमैत्रीण किंवा ज्यूनियर आहे का? असा रिप्लाय देतो.
हे लीक चॅट्स पोलिसांनी स्वामीच्या मोबईल फोनचा फॉरेन्सिक रिव्ह्यू केल्यानंतर उजेडात आले आहेत. पोलिसांना तपास करताना असं आढळून आलं आहे की, हा स्वामी या चॅट्सदरम्यान आमिष दाखवून किंवा प्रलोभने देऊन आपल्या टार्गेट्सना फसवण्याचा आणि आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता.
स्वामी चैतन्यानंदच्या मोबाईल फोनमध्ये काही फोटो देखील सापडले आहेत. त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. त्याचे अनेक एअर होस्टेस सोबत देखील फोटो आहेत. पोलिसांना चौतन्यानंद हा संस्थेत शिकणाऱ्या मुलींना पद्धतशीरपणे ब्लॅकमेल करत होता असा देखील दावा केला आहे. एकूण ३२ विद्यार्थिनींपैकी १७ विद्यार्थिनींनी स्वामी चैतन्यानंदवर असभ्य भाषा, आक्षेपार्ह व्हॉट्स अॅप संदेश पाठवल्याचा आणि अवांच्छित स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.