

PM Modi RSS 100th Year :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभराव्या स्थापना दिनाचं औचित्य साधून संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारत सरकारनं संघाच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून एक खास टपाल तिकीट आणि नाणं प्रसिद्ध केल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी या तिकीटाचे आणि नाण्याचे वैशिष्ठ देखील नमूद केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र कोरलं गेलं असेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १०० रुपयांचे विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.
या समारंभात बोलताना मोदी म्हणाले, "१०० वर्षांपूर्वी आरएसएसची स्थापना हा केवळ योगायोग नव्हता, तर ते हजारो वर्षांच्या परंपरेचं उत्थान आणि या युगातील राष्ट्रीय चेतनेचा अनादी अवतार आहे."
याचबरोबर त्यांनी आमच्या पिढीच्या स्वयंसेवकांना आरएसएसच्या शताब्दी वर्ष पाहता आलं. या समारंभात समील होता आलं हे खूप भाग्याचं आहे असं देखील सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 'आज विजयादशमीचा सण आहे. हे चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचं प्रतिक आहे. न्यायाचं अन्यायाविरूद्ध विजय मिळवण्याचं प्रतिक आहे. काळोखावर उजेडानं मिळवलेल्या विजयाचं प्रतिक आहे. याच दिवशी आरएसएस सारख्या महान संस्थेचं शताब्दी वर्ष येणं हा काही योगायोग नाही.' असं देखील म्हणाले.
ऐतिहासिक मुद्रा :
जारी करण्यात आलेल्या १०० रुपयांच्या नाण्याची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक खासियत म्हणजे, त्याच्या दुसऱ्या बाजूला सिंहासोबत वंदन मुद्रेमध्ये भारत मातेचं तेजस्वी चित्र आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र कोरण्यात आले आहे. या चित्रात स्वयंसेवक भारत मातेला नमन करताना दिसत असून, त्यावर संघाचे बोधवाक्यही आहे.
१९६३ च्या परेडची स्मृती :
आज प्रसिद्ध झालेल्या विशेष टपाल तिकिटालाही मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. या तिकिटात १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) परेडमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या सहभागाच्या ऐतिहासिक क्षणाची स्मृती जतन करण्यात आली आहे.
आमच्या पिढीला हे गौरवपूर्ण शताब्दी वर्ष पाहण्यास मिळत आहे, हे आपले भाग्य आहे, असे मोदींनी यावेळी नमूद केले. या अनावरणामुळे संघाच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली आहे.