Ram Navami 2026 | अयोध्येत रामलल्लांवर ‘सूर्य तिलक’ सोहळा

कपाळावर 9 मिनिटे तेजस्वी सूर्यकिरणांचा अभिषेक
Ram Navami 2026 |
Ram Navami 2026 | अयोध्येत रामलल्लांवर ‘सूर्य तिलक’ सोहळा
Published on
Updated on

अयोध्या; वृत्तसंस्था : रामनवमीच्या पावन पर्वावर अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीवर ‘सूर्य तिलक’ सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता अभिजित मुहूर्तावर सूर्यकिरण थेट कपाळावर पडले आणि तब्बल 9 मिनिटे हा तेजस्वी तिलक झळकत राहिला. या दिव्य क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10 लाख भाविक अयोध्येत दाखल झाले होते.

प्राणप्रतिष्ठेनंतर 2024 पासून सुरू झालेला हा तिसरा सूर्य तिलक सोहळा आहे. यापूर्वी 2024 आणि 2025 मध्येही हा सोहळा पार पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दूरदर्शनवरून हा सोहळा पाहिला.

विशेष पूजा आणि आरती

सूर्य तिलक सोहळ्यानंतर 14 पुजार्‍यांनी गर्भगृहात विशेष पूजा केली. त्यानंतर आरती पार पडली. यावेळी रामलल्लांना 56 प्रकारच्या नैवेद्याचा भोग अर्पण करण्यात आला. हाच सुमारे 10 क्विंटल प्रसाद नंतर भाविकांना वितरित करण्यात आला.

अष्टधातूच्या यंत्रणेचा वापर

या सोहळ्यासाठी 65 फूट लांबीची अष्टधातूपासून तयार केलेली पाईपलाईन बसवण्यात आली होती. चार लेन्स आणि चार आरशांच्या सहाय्याने सूर्यकिरण अचूकपणे मूर्तीच्या कपाळावर केंद्रित करण्यात आले. ही यंत्रणा बंगळूरच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

चैत्र नवरात्रीचा समारोप

रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा अंतिम दिवस असून, या काळात भक्त उपवास, पूजा आणि ध्यान करतात. भगवान रामांच्या जन्मदिनी संपूर्ण देशभरात उत्सव साजरा केला जातो; मात्र अयोध्येतील सोहळा विशेष भव्यतेने पार पडतो.

श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा संगम

‘सूर्य तिलक’ सोहळा हा श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान यांचा अनोखा संगम मानला जात आहे. अचूक गणित आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घडणारा हा सोहळा भाविकांसाठी अत्यंत आध्यात्मिक आणि अविस्मरणीय ठरला.

रामलल्लांचा दिव्य साज

पहाटे 5.30 वाजता मंगळ आरती करण्यात आली. त्यानंतर रामलल्लांना सोनेरी भरतकाम असलेले पिवळे वस्त्र परिधान करण्यात आले. मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले.

, , , , Ram Navami celebration, religious event India,, spiritual ceremony Ram, Uttar Pradesh religious news, devotional traditions India

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news