Crime News: भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला, मग अंगावर घातली कार; बारामतीच्या लेकीचा कर्नाटकात करुण अंत, थरारक व्हिडिओ समोर!

karnataka murder case: भररस्त्यात पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला, त्यानंतर तिच्या अंगावर कार घातली.
karnataka murder case
karnataka murder casefile photo
Published on
Updated on

karnataka murder case

हुबळी: भररस्त्यात पतीने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला, त्यानंतर तिच्या अंगावर कार घातली. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील बलुर्गी गावाजवळ गुरुवारी घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

karnataka murder case
Jalgaon Crime | पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा राग: तरुणाचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट

नेमकी घटना काय?

सहेली (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून ती महाराष्ट्रातील बारामती येथील रहिवासी होती. सहेली आणि तिचा पती अक्षय हे दोघे कारने बारामतीहून अफझलपूर तालुक्यातील देवलगापूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान, बलुरगी गावाच्या शिवारात मुख्य रस्त्यावर अक्षयने अचानक कार थांबवली. तिथे त्याने सहेलीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा गळा चिरला. रक्तबंबाळ अवस्थेत ती तडफडत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिच्या अंगावर कार घालून तिची हत्या केली.

माणुसकीला काळिमा: लोक वाचवण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात मग्न

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या भररस्त्यात सुरू असताना तिथून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. मदतीसाठी पुढे येण्याऐवजी अनेकजण उभे राहून हा थरार पाहत राहिले, तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अड्डूर श्रीनिवासलू, स्थानिक सीपीआय आणि पीएसआय यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या क्रूर हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अफझलपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

karnataka murder case
Kolhapur Murder | पैशाच्या वादातून मुलानेच बापाचा घेतला बळी; माजी सैनिकाच्या डोक्यात वार करुन निर्घृण खून!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news