Crime News: मैत्रीला काळिमा! जीवाभावाच्या मित्राने पत्नीसोबत सूत जुळवलं; सहन नाही झालं अन् पतीने दोघांनाही संपवलं

UP husband kills wife and lover: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि मित्राची राहत्या घरात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि मित्राची राहत्या घरात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पत्नीचे आपल्या मित्रासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक म्हणजे, हे संपूर्ण हत्याकांड या दाम्पत्याच्या ७ वर्षांच्या मुलासमोर घडले. हत्या केल्यानंतर ‘आता सगळं ठीक होईल’ असे मुलाला सांगून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

मित्राला घरी जेवायला बोलावलं अन्...

ट्रोनिका सिटीमधील रामपार्क कॉलनीत राहणारा ३८ वर्षीय राशीद फर्निचरचा व्यवसाय करतो. त्याचा मित्र फहीम (वय ३२) हा देखील याच व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत होता. सोमवारी रात्री राशीदने फहीमला जेवणासाठी घरी बोलावले होते. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर राशीद, त्याची पत्नी शबनम (वय ३६) व फहीम यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. मध्यरात्रीच्या सुमारास वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. राशीदने कपाटातून बंदूक काढली आणि आधी फहीमच्या डोक्यात गोळी झाडली, त्यानंतर पत्नी शबनमचीही हत्या केली.

Crime News
Mother Killed Daughter: आई झाली हैवान! निष्पाप मुलीचं कुऱ्हाडीनं शीर केलं धाडावेगळं; ब्लॅक मॅजिकचा संशय?

आता सगळं ठीक होईल...

या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी राशीदचा ७ वर्षांचा मुलगा आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वडिलांनी दोघांची हत्या केल्यानंतर अतिशय शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि "आता सगळं ठीक होईल," असे म्हणून घर सोडून निघून गेले. या दाम्पत्याला दीड वर्षांपासून ते २० वर्षांपर्यंतची एकूण ७ मुले आहेत.

पूर्ववैमनस्य की नियोजित कट?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम आणि फहीम यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ६ महिन्यांपूर्वी मोठ्या मुलाच्या लग्नावेळी राशीदला याची कुणकुण लागली होती. शबनमला घराची विक्री करून राशीदपासून घटस्फोट हवा होता, यावरूनही त्यांच्यात वाद सुरू होते. राशीदने फहीमला जेवणाच्या बहाण्याने बोलावून ही हत्या केल्याने, हा कट आधीच रचला असावा असा पोलिसांचा संशय आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

डीसीपी सुरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, मृत फहीमवर यापूर्वी हत्या करण्याचा प्रयत्न आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी राशीदलाही २०२३ मध्ये चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. पोलिसांनी सध्या राशीदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Crime News
Hyderabad Shocking News: आई आहे की सैतान... १४ महिन्याच्या मुलीचा उशीने तोंड दाबून घेतला जीव; रमजानमध्ये पतीसोबत झाला वाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news