Supreme Court : आवश्यक पात्रता नसेल तर परीक्षेतील गुण व्यर्थ; नोकरी भरतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

विहित पात्रता अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांमध्येच गुणवत्तेची तुलना शक्य
supreme court
supreme courtpudhari photo
Published on: 
Updated on: 

Supreme Court verdict on recruitment eligibility rules

सरकारी नोकरभरती नियमांनुसार विहित केलेली आवश्यक पात्रता असणे अनिवार्यच आहे. आवश्यक पात्रता नसेल तर केवळ परीक्षेत मिळालेले गुण ही उणीव भरून काढू शकत नाहीत. विहित पात्रता अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांमध्येच गुणवत्तेची तुलना केली जाऊ शकते, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठाने गोवा सरकारमधील 'व्यावसायिक प्रशिक्षक (प्रात्यक्षिक)' पदावरील उमेदवाराची नियुक्ती रद्द केली.

कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान उमेदवाराची अपात्रता स्पष्ट

गोवा सरकारने 'व्यावसायिक प्रशिक्षक (प्रात्यक्षिक)' पदासाठी भरती जाहीर केली होती. संबंधित पदासाठी '१०+२ पद्धतीअंतर्गत १० वी उत्तीर्ण' असणे ही अनिवार्य अट होती. संबंधित उमेदवाराकडे 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग' (NIOS) द्वारे मिळवलेले माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) होते. गोवा शिक्षण मंडळाने '१०+२' शिक्षण पद्धतीतील इयत्ता १० वी उत्तीर्णतेशी ते समकक्ष मानले होते. मात्र, भरती नियमांनुसार उमेदवाराने "१०+२ शिक्षण पद्धतीअंतर्गत इयत्ता १० वी उत्तीर्ण" असणे आवश्यक होते आणि या पदासाठी NIOS ची इयत्ता १० वीची पात्रता ग्राह्य धरली जात नव्हती. परंतु, कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान निवड समितीने NIOS च्या पात्रतेला भरती नियमांनुसार अनिवार्य पात्रता मानण्यास नकार देत त्याला अपात्र ठरवले.

supreme court
Supreme Court : चुकीने दिलेला अतिरिक्त पगार कर्मचाऱ्यांकडून वसूल केला जाऊ शकतो : सुप्रीम कोर्टाने फेटाळली शिक्षकांची याचिका

उमेदवाराची उच्च न्यायालयात धाव

याविरोधात संबंधित उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने शैक्षणिक मंडळाच्या मान्यतेचा आधार घेत उमेदवाराला पात्र ठरवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या निर्णयाविरोधात गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत न्यायाधीश पंचोली म्हणाले, "भरती नियमांमध्ये '१०+२ पद्धतीअंतर्गत' हा शब्दप्रयोग स्पष्ट आणि अनिवार्य आहे. NIOS ची सनद ही सामान्यतः मान्यताप्राप्त आहे की नाही, हा प्रश्न नसून; ती या विशिष्ट भरती नियमांमधील अटींची पूर्तता करते का, हा मुख्य मुद्दा आहे."

supreme court
Supreme Court : 'निर्भया' प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही; दिल्लीतील बलात्कार प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी

गुणांपेक्षा भरती प्रक्रियेतील पात्रता महत्त्वाची

उमेदवाराला जास्त गुण मिळाल्याचा दावा फेटाळून लावताना न्यायालयाने स्पष्ट केले की, "पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमध्येच गुणांची तुलना होऊ शकते. लेखी परीक्षेत मिळालेले जास्त गुण हे मूलभूत पात्रतेचा अभाव भरून काढू शकत नाहीत. तसेच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा वापर करून भरती नियमांमधील अटींमध्ये बदल किंवा वाढ केली जाऊ शकत नाही."

supreme court
Supreme Court : 'शिवसेना प्रकरणात विलंबामुळे काय होते हे आम्‍ही पाहिलय': TMC पक्षचिन्ह सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची टिपण्णी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news