Supreme Court |ट्रस्टची मालमत्ता 'खाजगी बाब' नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय

आंध्र प्रदेशातील चर्चच्या जमीन विक्रीप्रकरणी फौजदारी खटला पुन्‍हा सुरु करण्‍याचे आदेश
Supreme Court |ट्रस्टची मालमत्ता 'खाजगी बाब' नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय
Published on
Updated on

Supreme Court trust property verdict

नवी दिल्ली : ट्रस्टच्या माध्यमातून समुदायासाठी धारण केलेली मालमत्ता ही केवळ 'खाजगी बाब' मानली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत आंध्र प्रदेशमधीलअनंतपूरम येथील चर्चच्या ७.७५ एकर जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित आरोपींवरील फौजदारी खटले रद्द करण्याचा उच्‍च न्‍यायालया निर्णय न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने रद्द केला.

एक एकर जमीन विक्रीला परवानगी प्रत्‍यक्षात विक्री ७ एकरची

आंध्र प्रदेशमधीलअनंतपूरम येथील चर्चची २२ सप्टेंबर २००७ रोजी विक्री झाली होती. विक्री करारातील कथित बनावटगिरी आणि फसवणुकीचा आरोप करण्‍यात आला. १० फेब्रुवारी २००७ च्या ठरावानुसार केवळ १ एकर जमीन आणि एक बंगला विकण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात ७.७५ एकर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले.साक्षीदारांचे जबाब आणि संस्थेचे रेकॉर्ड पाहता, ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी केवळ एक एकर जमिनीच्या विक्रीला मंजुरी दिली होती आणि उर्वरित जमिनीच्या विक्रीसाठी कोणताही नवीन ठराव अधिकृत रेकॉर्डवर आढळला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

Supreme Court |ट्रस्टची मालमत्ता 'खाजगी बाब' नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय
Supreme Court |सुनेशी होणारी साधी भांडणे म्हणजे क्रूरता किंवा 'हुंड्यासाठीचा छळ' नव्हे : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

उच्‍च न्‍यायालयाने दिला होता फौजदारी खटले रद्द करण्याचा आदेश

या प्रकरणी आंध्र प्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फौजदारी खटले रद्‍द करण्‍या आदेश दिला होता. याविरोधा सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात आली होती. यावर न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Supreme Court |ट्रस्टची मालमत्ता 'खाजगी बाब' नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय
Elvish Yadav| सापाचे विष 'NDPS'च्या कक्षेत येत नाही: 'रेव्ह पार्टी' प्रकरणातील एल्विस यादववरील खटला सुप्रीम कार्टाकडून रद्द

ट्रस्टची जमीन म्हणजे जनतेची मालमत्ता : सर्वोच्च न्यायालय

खंडपीठाने स्पष्ट केले की, एखाद्या ट्रस्टची मालमत्ता ही मूळतः समाजाच्या फायद्यासाठी असते. जरी या मालमत्तेचा कारभार एखादी खाजगी संस्था किंवा कंपनी (कॉर्पोरेट बॉडी) पाहत असली, तरी ती लोकांच्या हिताचीच असते.. त्यामुळे अशा जमिनीच्या व्यवहारात किंवा विक्रीत जर काही चूक किंवा गैरप्रकार झाला, तर तो केवळ त्या संस्थेचा वैयक्तिक विषय नसून संपूर्ण जनतेच्या हिताचा आणि चिंतेचा विषय ठरतो."

Supreme Court |ट्रस्टची मालमत्ता 'खाजगी बाब' नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय
Railway travel insurance | रेल्वे प्रवाशांना दिलासा : काउंटर तिकिट असलेल्यांना नाकारता येणार नाही विमा : सर्वोच्च न्यायालय

तक्रार दाखल विलंब खटला रद्द करण्यासाठी पुरेसा नाही

उच्च न्यायालयाने तक्रारदाराच्या अधिकारावर आणि तक्रार देण्यास झालेल्या उशिरावर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे मुद्दे फेटाळून लावले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, जोपर्यंत कायद्यात स्पष्ट मनाई केलेली नसते, तोपर्यंत गुन्ह्याची माहिती असणारी कोणतीही व्यक्ती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करू शकते. केवळ तक्रार देण्यास विलंब झाला या कारणावरून खटला रद्द केला जाऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा संबंधित गुन्हा उशिरा उघडकीस आलेला असतो. थोडक्यात, गुन्ह्याची माहिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने अपील मंजूर करत फौजदारी कारवाई पुन्हा सुरू केली असून, कनिष्ठ न्यायालयाला ज्या टप्प्यावर हा खटला थांबला होता, तिथून तो पुढे चालवण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news