

Kuldeep Sing Sengar: उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगरला सर्वोच्च न्यायालयानं मोठा झटका दिला. सर्वोच्च न्यायालयानं भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरला दिलासा देणारा दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. न्यायालयानं याबाबत टिप्पणी करताना सेंगरवरचे आरोप गंभी असल्याचे सांगितले.
अशा गुन्हेगाराला कोणत्याही प्रकरणात जामीन मिळू नये. चीफ जस्टिस सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील बेंचने सेंगरच्या वकिलांना नोटीस पाठवली असून दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात आता याबाबतची पुढची सुनावणी ही चार आठवड्यानंतर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीच्या सुरूवातीलाच स्फष्ट केलं की आम्ही सध्याच्या घडीला उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याच्या बाजूने आहोत. या सुनावणीत युक्तीवाद हा फक्त स्टे च्या मुद्द्यावरच होईल. न्यायालयानं सेंगर हा दुसऱ्या प्रकरणात जेलमध्ये बंद आहे. स्थिती खूपच विचित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयानं आज या प्रकरणात अंतिम निर्णय देणार नसल्याचं स्पष्ट केल. यावर कुलदीप सेंगरच्या विकालांनी मधे हस्तक्षेप करण्याची परवानगी मागितली. त्यावर कोर्टानं नोटीस जारी करत दोन आठड्यांनी उत्तर सादर करण्यास सांगितलं. कोर्टानं स्पष्ट सांगितलं की सेंगरला जेलमधून बाहेर सोडण्यात येणार नाही.
चीफ जस्टिस सूर्य कांत यांनी कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयांनी दोषी ठरवल्याचे सांगितले. पीडितेच्या वकिलांनी पीडित कुटुंबीयाला अजूनही धोका आहे. त्यावर सूर्य कांत यांनी तुम्हाला न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे असे सांगितले. तुमच्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. कुलदीप सिंह सेंगरच्या वकिलाने चीफ जस्टिस यांना सांगितले की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे फोटो व्हायरल केले जात आहेत.
यावर बोलताना सूर्य कांत यांनी हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. आम्हाला माहिती आहे की लोक याचा राजकी फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यवस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करू नये. ते म्हणाले की, तुम्ही या सर्व गोष्टी रस्त्यावर आणू शकत नाही. कोर्टाच्या आत चर्चा करा आता पुढची सुनावणी ही पुढच्या महिन्यात होईल.