Supreme Court : 'पोलिसांकडे जा, व्यवस्थेवर विश्वास ठेवा': प्रेषितांवरील टिप्पणीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

याचिकेवर तत्‍काळ सुनावणीस न्‍या. अमानुल्ला आणि न्यायमूर्ती नागू यांच्या खंडपीठाचा नकार
Supreme Court On Government Doctors
supreme courtpudhari photo
Published on
Updated on

Supreme Court On Prophet Comments : "तुम्ही गुन्हा दाखल केला आहे का? पोलीस यंत्रणा तिथे आहेच. आमच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा. आम्ही सर्वोच्च न्यायालय आहोत, आम्ही फक्त देखरेख करण्यासाठी येथे आहोत," असे स्‍पष्‍ट करत प्रेषित मुहम्मद यांच्यावर एका इन्फ्लुएंसरने कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिकेवर तातडीने सुनावणीस आज (दि. ६ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

इन्फ्लुएंसरवर अनेक गुन्‍हे दाखल

'लाईव्‍ह लॉ'च्‍या वृत्तानुसार, जून महिन्यात एका पॉडकास्ट दरम्यान इन्फ्लुएंसर नाझिया इलाही खान हिने प्रेषित मुहम्मद आणि त्यांच्या कुटुंबियांवर कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेनंतर संबंधित इन्फ्लुएंसरवर अनेक एफआयआर (FIR) दाखल करण्यात झाले आहेत.

Supreme Court On Government Doctors
Supreme Court : व्यभिचारी जोडीदाराला 'गोपनीयते'चा अधिकार 'ढाल' म्हणून वापरता येणार नाही : सर्वोच्‍च न्‍यायालय

प्रकरण थेट सर्वोच्‍च न्‍यायालयात

या प्रकरणी अन्सार अहमद चौधरी यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली आहे. वकील रजत कुमार यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर उपस्थित केले. अशा टिप्पण्यांमुळे जातीय सलोखा बिघडू शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Supreme Court On Government Doctors
HC Verdict: लग्नानंतर ६ वर्ष मूल नाही; श्‍वानालाच मानले 'कान्हा'; धार्मिक भावना दुखावण्याच्‍या FIRबाबत हायकोर्ट काय म्‍हणाले?

"व्यवस्थेवर विश्वास ठेवा"

याचिकाकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनाला बगल देऊन थेट सर्वोच्च न्यायालयात येण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले, "तुम्ही गुन्हा दाखल केला आहे का? पोलीस यंत्रणा तिथे आहेच. आमच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा. आम्ही सर्वोच्च न्यायालय आहोत, आम्ही फक्त देखरेख करण्यासाठी येथे आहोत."

Supreme Court On Government Doctors
Delhi HC verdict : भांडणावेळी 'मारो साले को' म्हणणं म्हणजे हत्येचा हेतू नव्हे: हायकोर्ट

सर्व काही सर्वोच्‍च न्‍यायालयात झाले तर...

आमचे कनिष्ठ अधिकारी काम करत आहेत की नाही, हे आमच्यासाठी देखील डोळे उघडणारे आहे. सर्व काही येथेच (सर्वोच्च न्यायालयात) शॉर्ट-सर्किट झाले, तर ते सुद्धा हात वर करतील. हेच घडत आहे. सर्व संस्था विस्कळीत होत आहेत कारण प्रत्येक गोष्ट वरूनच येते, असे स्‍पष्‍ट करत अशा गोष्टींचे सनसनाटीकरण करू नये, असा इशाराही न्यायाधीशांनी दिला. सामान्य प्रक्रियेतून योग्य कारवाई न झाल्यास हा मुद्दा पुन्हा मांडता येईल, असेही न्‍यायमूर्ती अमानुल्‍ल यांनी स्‍पष्‍ट केले.

Supreme Court On Government Doctors
Supreme Court | लग्नानंतर मुलीचे माहेरशी नाते तुटत नाही! 'ती' रूढीवादी मानसिकता राज्यघटनेशी विसंगत; सर्वोच्च न्यायालयाची चपराक

तुम्ही सर्वप्रथम भारताचे नागरिक आहात...

"ही गंभीर बाब आहे, मी तुमच्याशी सहमत आहे... माझ्या वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर, मी याबद्दल खूप संवेदनशील आहे... पण एक प्रक्रिया आहे. जर ती काम करत नसेल, तर आमच्याकडे या. संवेदनशील बाबतीत, तुम्ही सर्वप्रथम भारताचे नागरिक आहात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. तुम्ही वकील आहात... तुम्हाला कायदा माहित आहे. तुम्हाला त्याचे परिणाम समजतात. अशा गोष्टींचे सनसनाटीकरण करू नका. जर एका व्यक्तीने चूक केली असेल, तर कायद्याच्या संपूर्ण बळाचा वापर करून त्याला जाब विचारा," असेही न्‍यायमूर्ती अमानुल्‍ल यांनी नमूद केले.

याचिकेतून कोणत्‍या मागण्‍या केल्‍या आहेत?

डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेषित मुहम्मद आणि भगवान श्री राम यांच्यासह इतर आदरणीय धार्मिक व्यक्तींबद्दल हेतुपुरस्सर अपमानजनक, आक्षेपार्ह किंवा मानहानीकारक मजकूर प्रकाशित, प्रसारित आणि पसरवण्यावर बंदी घालण्यासाठी व तो नियंत्रित करण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे/नियम तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करावी. धार्मिक भावना दुखावण्यासाठी आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि 'एक्स' यांसारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मानहानीकारक व्हिडिओ आणि पोस्ट/प्रकाशने त्वरित ओळखणे, काढून टाकणे आणि नष्ट कराव्‍यात, अशी मागणीही याचिकेतून करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news