HC Bail Order New Guidelines Supreme Court: आता तारीख पे तारीख चालणार नाही... SC ने राखीव निकाल ३ महिन्यात देण्याचे दिले निर्देश

HC Bail Order New Guidelines Supreme Court
HC Bail Order New Guidelines Supreme Courtpudhari
Published on
Updated on

HC Bail Order New Guidelines Supreme Court: देशातील न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना निर्देश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राखीव निकाल, जामीन आदेश आणि त्यांच्या कारणांना सार्वजनिक करण्यासाठी एक कालमर्यादा घालून दिली आहे.

HC Bail Order New Guidelines Supreme Court
Supreme Court Virtual Hearing | ऑनलाईन सुनावणी सक्तीची करता येणार नाही! सरन्यायाधीशांनी स्पष्टच सांगितले कारण...

राखीव निकालांसाठी ३ महिने

सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकरणात निकाल राखीव ठेवल्यानंतर तो जास्तीजास्त तीन महिन्याच्या आत सुनवला जावा असे निर्देश दिले आहेत. तसेच जामीनबाबतचा आदेश सहसा पुढच्या दिवशी दिला गेला पाहिजे. तसेच त्याच दिवशी तो जेल प्रशासनाला देखील कळवला गेला पाहिजे.

HC Bail Order New Guidelines Supreme Court
Sanjay Kapur Estate Dispute| संजय कपूर मालमत्ता वादात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड 'मध्यस्थ'; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

त्याच दिवशी जामीनावर सुटका

न्यायालयाने ज्या अंडर ट्रायल कैद्यांना जामीन मिळाला आहे त्यांची तुरूंगातून सुटका त्याच दिवशी जास्तीजास्त दुसऱ्या दिवशी झाली पाहिजे असे देखील निर्देश दिले आहेत. नव्या दिशा निर्देशानुसार न्यायालयाने आदेशातील ऑपरेटिव्ह पार्ट पहिल्यांदा कोर्टात सुनावला जाईल. त्यानंतर त्याची विस्तृत कारणे सात दिवसांच्या आत वेबसाईटवर अपलोड केली जातील. तसेच ज्या दिवशी निकाल राखीव ठेण्यात येईल त्याची माहिती संबंधित उच्च न्यायालय वेबसाईटवर प्रदर्शित करेल.

HC Bail Order New Guidelines Supreme Court
Defamation Suit Adjourned 2046 | 'अहंकाराच्‍या लढाई'स हायकोर्टाचा दणका, ९० वर्षीय पक्षकाराचा खटला थेट २०४६ पर्यंत तहकूब!

तर नव्या पीठाकडे प्रकरण जाणार

सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवलेल्या कालमर्यादेचे पालन झाले नाही तर हे प्रकरण दुसऱ्या कोणत्या तरी पीठाकडे सोपवलं जाऊ शकतं. जर निर्णयाची कारणे ३० दिवसांच्या आत अपलोड झाली नाहीत तर ते प्रकरण पुन्हा नव्या पीठासमोर पाठवलं जाऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयाच्या रजिस्टार जनरल यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. हे दिशा निर्देश संबंधित मुख्य न्यायाधीशांसमोर सादर करावे जेणेकरून या दिशा निर्देशांचे पालन योग्य प्रकारे करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news