SC On Abortion Plea: पतीसोबत भांडण, सहा महिन्याच्या गर्भवतीने मागितली गर्भपाताची परवानगी; समाज कुठं चाललाय म्हणत SC चे निर्देश

पतीने न जन्मलेल्या बाळावर आपला देखील अधिकार आहे म्हणत याचिकेला केला विरोध, सर्वोच्च न्यायालयासमोर पेच
SC On Abortion Plea
SC On Abortion Pleapudhari
Published on: 
Updated on: 

Supreme Court On Abortion Plea : सर्वोच्च न्यायालयात एक महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना बेंच एका विचित्र परिस्थिती सापडलं होतं. एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात तिच्या पोटात वाढणारा सहा महिन्याचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी मिळावी म्हणून याचिका केली होती. तिने या गर्भपातासाठी तिच्या पतीसोबत असलेले भांडण हे कारण दिलं होतं. या याचिकेला पतीने विरोध केला होता. त्याने दावा केला होता की या जन्म न झालेल्या मुलावर त्याचा देखील अधिकार आहे असा दावा केला होता.

SC On Abortion Plea
Supreme Court | ‘तिकीट महाग वाटत असेल तर विमान प्रवास करू नका’; न्यायालयाची टिप्पणी!

गर्भपाताचं वेगळंच कारण

सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस बी व्ही नागराथना आणि आर महादेवन यांनी फक्त बलात्कार आणि लैंगिक छळ किंवा जर गर्भात काही समस्या असेल तरच गर्भपाताची परवानगी दिली जाते असं सांगितलं. मात्र सध्याची जी केस आहे ती वेगळ्या कारणासाठी आहे असं सांगितलं. जर एखाद्या महिलेने पतीकडून वाईट वागणूक आणि सासरकडच्या छळाचे कारण देऊन जर गर्भपात करायचा निर्णय घेतला तर समाज कुठल्या दिशेले जात आहे असा सवाल देखील त्यांनी विचारला.

SC On Abortion Plea
Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी दोन डॉक्टरसह तिघांना कारावास

गर्भाच्या आरोग्याची होणार तपासणी

सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने हा गर्भ प्रेमामुळेच निर्माण झाला आहे आणि या अजून जन्म न झालेल्या मुलावर वडिलांचा देखील हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका जलद गतीने पुढे सरकरवली कारण जर गर्भाची स्थिती चांगली असेल तर तिने गर्भपाताची विनवणी करू नये,

कोर्ट म्हणाले, 'पत्नी पतीविरूद्ध बोलणे आणि पती पत्नीविरूद्ध बोलणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र त्याच अर्थ असा नाही की तुम्ही या (भांडणाच्या) आधारावर गर्भपाताची मागणी करावी. ही काही लैंगिक छळाची किंवा एकल गर्भवती माता असल्याचे प्रकरण नाही. जर पतीसोबत, सासरी भांडण झालं म्हणून एक महिला जर गर्भपाताची मागणी करत असेल तर एक समाज म्हणून आपण कुठल्या दिशेला जात आहोत, मग वडिलांच्या अधिकारांचे काय?'

SC On Abortion Plea
Supreme Court : सहमतीने शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्‍हे, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

पतीलाही प्रतिज्ञापत्र करावं लागणार सादर

याचिकाकर्त्यांसोबत बेंचने व्हर्च्युअली संभाषण केलं. त्यावेळी महिलेने सांगितलं की तिला हा गर्भ वाढवायचा नाहीये. तिला घटस्फोट हवा आहे. मात्र पतीने सांगितलं की बाळाच्या जन्मानंतर तो त्याची काळजी घेईल त्यामुळे कोर्टाने गर्भपाताची परवानगी देऊ नये अशी विनंती केली आहे.

हे प्रकरण ज्यावेळी पुरूषाने याचिकाकर्त्या महिलेच्या चारित्र्यावर आरोप केले त्यानंतर चिघळलं. कोर्टाने पुरूषाला सर्वात आधी हे सर्व आरोप मागे घेत असल्याचे प्रितज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं त्यानंतर पुन्हा कोर्टासमोर या असं सांगितलं. आता या प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.