Supreme Court: मोठा निर्णय! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाची एन्ट्री; 27 जुलैला होणार महत्त्वाची सुनावणी

Supreme Court CJP Protest Jantar Mantar Petition: या प्रकरणाची सुनावणी 27 जुलै (सोमवार) रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
Supreme Court
Supreme CourtPudhari
Published on
Updated on

Supreme Court CJP Protest Jantar Mantar Petition: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली असून 27 जुलै (सोमवार) रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Supreme Court
Raj Thackeray: 'विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई का नाही?' दिल्ली आंदोलनावरून राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

या प्रकरणाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयासमोर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावर आता न्यायालयीन सुनावणी होणार आहे.

तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. याचिकाकर्त्यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जाची न्यायालयीन चौकशी करण्याची तसेच संबंधित प्रकरणात आवश्यक निर्देश देण्याची मागणी केली आहे.

Supreme Court
Paper Leak Bill: पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास; 10 कोटी दंड, 3 महिन्यांत निकाल

जंतर-मंतर आंदोलनामुळे देशभरात चर्चा

NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला असून त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी घेणार असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news