Subhash Chandra Case: माझ्याकडे काही नाही... अर्धे घर भाड्याने दिलंय त्यावरच जगतोय... सुभाष चंद्रांचा नवा Video चर्चेत

Subhash Chandra Case
Subhash Chandra Casepudhari
Published on
Updated on

Subhash Chandra Case: कधी काळी देशातील एक मोठं उद्योग घराणं म्हणून सुभाष चंद्रा यांच्या घराण्याकडे पाहिले जात होतं. मात्र आता आर्थिक संकट आणि एनसीएलटीची त्यावरील कारवाईमुळे सुभाष चंद्रा पुन्हा चर्चेत आले आहेत. झी एन्टरटेनमेंटचे संस्थापक आणि एस्सेल ग्रुपचे चेअरमन राहिलेल्या चंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा उलगडा केला आहे.

त्यांनी सघ्याच्या घडीला त्यांच्यावरील जवळपास ३९०० कोटी रूपयांच्या दावा, ग्रुपची जुनी कर्जे आणि भविष्यातील योजना याच्यावर भाष्य केलं. त्यांनी या व्हिडिओत आता त्यांच्याकडे फक्त त्यांचे छोटे घर असून त्याचा काही भाग त्यांनी भाड्याने दिला आहे. त्याच्या भाड्यावरच आपला खर्च सुरू असल्याचा दावा चंद्रा यांनी केला आहे.

Subhash Chandra Case
Zee vs Nykaa: इन्स्टाग्राम रिल्समध्ये विनापरवाना गाणी वापरणे भोवले! 'झी'ने 'नायका'वर ठोकला २ कोटींचा दावा; काय आहे प्रकरण?

माझ्याकडे फक्त ६.५ कोटी रूपये

सुभाष चंद्रा यांनी सांगितलं की सध्याच्या घडीला त्यांच्याकडे जवळपास ६.५ कोटी रूपये उगले आहेत. एनसीएलटीच्या योजनेअंतर्गत ही रक्कम देणेकरांची देणी देण्यासाठी वापरली जाणार आहे. असं असलं तरी आपण सर्व काही गमावलं आहे असं चंद्रा मानत नाहीत. ते म्हणतात की मी पुन्हा उभारी घेऊ शकतो.

चंद्रा यांनी आपल्या सध्याच्या आयुष्याचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक छोटे राहते घर आहे. त्याचा काही भाग त्यांनी भाड्याने दिला आहे. या भाड्यावरच ते रोजचा खर्च भागवत आहेत. ज्या साम्राज्याची कधी हजारो कोटींचे मुल्य होते त्याचे संस्थापक आता भाड्यावर जगत आहेत.

चंद्रा यांनी सांगितलं की त्यांना कोणताही पश्चाताप नाहीये. ते म्हणतात की मी आज तुमच्याशी हसून बोलतोय. कारण माझं सर्व काही गेलेलं नाहीये. शेवटी माझे उरलेले साडे सहा कोटी देखील प्लॅन नुसार पे करायचे आहेत. माझे एक छोटे घर आहे. त्याचा अर्धा भाग मी भाड्याने दिला आहे. त्याच्या पैशातूनच मी माझा खर्च करत आहे. मला कोणताही पश्चाताप नाहीये. मी पुन्हा पैसे कमवू शकतो. मी संस्थापक आङे. मला माहिती आहे की चांगल्या आणि नवीन गोष्टी कशा करायच्या. मी पुढेही ते करत राहीन.

Subhash Chandra Case
FIFA World Cup 2026 India broadcast | भारतात फिफा विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण करणार 'झी'चे 'Unite 8 Sports'

४५ हजार कोटींचे कर्ज होते?

सुभाष चंद्रा यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या एनसीएलटी कारवाईबाबत ३९०० कोटी रूपयांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या उद्योग समुहाने जवळपास ४५ हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र जवळपास ४३ हजार कोटी रूपये आधीच चुकवले आहे. त्यांच्या मते जवळपास २००० कोटी रूपयांची देणी अजून बाकी आहे.

चंद्रा यांनी सांगितलं की एनसीएलटीमध्ये त्यांच्याविरूद्ध सुरू असलेले मुख्य प्रकरण हे वैयक्तिक गॅरेंटीशी निगडीत आहे. ही गॅरेंटी त्यांनी कर्जदारांना दिली होती. चंद्रा यांनी दावा केला की काही कर्जदात्यांना मी त्यांचे सर्व पैसे दिले आहेत. मात्र तरी देखील त्यांनी एनसीएलटीकडे दावा दाखल केला आहे. ३९०० कोटींच्या दाव्यातील २००० कोटी रूपये असे कर्जदार आहेत ज्यांनी कधी माझी वैयक्तिक गॅरेंटी लागूच केली नव्हती.

Subhash Chandra Case
झी मराठी आणि कस्तुरी क्लब आयोजित ‘श्रावण सोहळा’

६२० कोटींचा दावा सेटल

चंद्रा यांनी सांगितलं की न्यायालयाने नियुक्त केलेल्या रिजॉल्युशन प्रोफेशनल्सने कर्जदारांकडून दाखल दावे स्विकार केले होते. त्यांच्या मते जवळपास ६२९ कोटी रूपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या ग्रुपने कर्ज घेणाऱ्या कंपन्यांकडून कर्जदारांना जवळपास ११०० कोटी रूपयांची ऑफर देखील दिली होती.

चंद्रा यांनी त्यांची कपंनी अजून देखील कर्जदारांचे पैसे चुकवण्यासाठी प्रतिबद्ध असून कुटुंबाकडून एक शिकवण मला मिळाली आहे. ज्यांचे पैसे द्यायचे आहेत त्यांचे पैसे परत केले पाहिजेत.

कौटुंबीक संपत्ती विकली

सुभाष चंद्रा यांनी २०१९ मध्ये आपल्या व्यवसायावर आलेल्या संकटाबाबत सांगितले. ते म्हणाले की, त्यावेळी मी माझ्या चुका मान्य केल्या. २४ जानेवारी २०१९ रोजी खुलं पत्र लिहलं ज्यात त्यांनी कर्ज घेतलेल्या कंपन्यांचे पैसे चुकवले जातील असं सांगितलं होतं. त्यानंतर चंद्रा यांनी दावा केला की त्यांच्या कुटुंबाने कर्ज चुकवण्यासाठी आपली संपत्ती विकली आहे.

चंद्रा यांनी संपत्ती विकली, कंपनी विकण्याचा प्रयत्न केला तसेच आपलं घर देखील भाड्यानं दिलं. त्यांनी कर्जदारांचे पैसे देण्याचा प्रयत्न सोडला नाही. ४५ हजार कोटीच्या मूळ कर्जातील ४३ हजार कोटी रूपये परत करण्यात आले आहेत. माझे काही पैसे हे राज्य सरकारांकडे अडकले आहेत. काही संपत्ती विकून कर्जदारांचे कर्ज भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चंद्रा यांनी ज्यावेळी मला कर्ज दिले गेले त्यावेळी माझी वैयक्तिक संपत्ती ही ४५ हजार कोटी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्यांनी सांगितलं की ग्रुपच्या मार्केट कॅपिटलची नेटवर्थ ही त्यांची वैयक्तिक संपत्ती असल्याचं मानलं गेलं. त्यांनी २०१६ मध्ये राज्यसभा खासदार झाले त्यावेळी दाखल संपत्ती घोषणा पत्राचा हवाला दिला आहे.

त्यावेळी त्यांची वैयक्तिक संपत्ती ही ३९ कोटी रूपये होती. २०१६ मध्ये असलेली ३९ कोटींची संपत्ती एका वर्षातच कशी काय ४५ हजार कोटी रूपये झाली. माझी वैयक्तिक संपत्ती ही ४५ हजार कोटी रूपये आहे हे आकडे एक मिथक आहे असा देखील दावा चंद्रा यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news