FIFA World Cup 2026 India broadcast | भारतात फिफा विश्वचषकाचे थेट प्रक्षेपण करणार 'झी'चे 'Unite 8 Sports'

FIFA World Cup 2026 India broadcast | ११ जूनपासून फिफा विश्वचषकाला होणार प्रारंभ
FIFA World Cup 2026 India broadcast
११ जूनपासून फिफा विश्वचषकाला सुरुवात होत असून, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.Pudhari.
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 India broadcast

नवी दिल्ली : 'फिफा विश्वचषक' २०२६ (FIFA World Cup)स्पर्धांचे भारतात थेट प्रक्षेपण 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड'च्या (ZEEL) नव्याने सुरू झालेल्या 'Unite8 Sports' या टीव्ही चॅनेल्सवर होणार आहे. ४८ संघ सहभाग घेणाऱ्या फुटबॉल महाकुंभमेळ्यघचे थेट प्रक्षेपण 'Zee5' या ॲपवरही उपलब्ध असेल. ११ जूनपासून फिफा विश्वचषकाला सुरुवात होत असून, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. फिफा आणि जिओस्टार (JioStar) यांच्यात चालू आणि आगामी स्पर्धांच्या किमतीबाबत एकमत न झाल्यामुळे या शर्यतीत 'ZEEL'ने उडी घेतली होती.

फुटबॉल विश्‍वचषकासह इतर महत्त्वाच्या फिफा स्पर्धांचे भारतात प्रक्षेपण

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'Unite8 Sports' या टीव्ही चॅनेल्स २०२६ आणि २०३० चे पुरुष फिफा विश्वचषक, २०२७ चा फिफा महिला विश्वचषक आणि २०३४ पर्यंतच्या इतर महत्त्वाच्या फिफा स्पर्धांचे भारतात प्रक्षेपण करतील. यामध्ये फिफाच्या डॉक्यु-सीरिज (माहितीपट)चाही समावेश असेल.पुरुष आणि महिला फिफा विश्वचषकाव्यतिरिक्त, 'झी' (Z) समूह अंडर-१७ विश्वचषक, महिला अंडर-१७ विश्वचषक, अंडर-२० विश्वचषक, महिला अंडर-२० विश्वचषक, फुटसाल विश्वचषक, महिला फुटसाल विश्वचषक आणि इंटरकॉन्टिनेंटल कपचे देखील प्रक्षेपण करणार आहे.

FIFA World Cup 2026 India broadcast
FIFA World Cup 2026 : इराणने फिफाला झुकवले! अमेरिकेतील सराव तळ हलवून मेक्सिकोत गाडले तंबू

फुटबॉल सामाजिक सीमां पलीकडचा खेळ : पुनीत गोयंका

'ZEEL'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पुनीत गोयंका म्हणाले की, "जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफाला भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे. फुटबॉल हा खेळ प्रादेशिक आणि सामाजिक सीमांच्या पलीकडे जाणारा आहे. माध्यम हक्क मिळवण्यासाठी आणि हक्काची स्पोर्ट्स चॅनेल्स सुरू करण्यासाठी आम्ही केलेली गुंतवणूक, ही या खेळाच्या भविष्यातील क्षमतेवर आमचा असलेला विश्वास दर्शवते."

FIFA World Cup 2026 India broadcast
कपिल देव यांची सही, भारतीय संघाने खरेदी केली दारू आणि सिगारेट? १९८३च्या पार्टीचे बिल व्हायरल; माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

मध्‍यरात्री सामने असल्‍याने प्रसारकांनी दाखवली नव्‍हती फारशी उत्सुकता

झी ने आपली काही मनोरंजन चॅनेल्स बंद करून, त्याऐवजी हिंदीत 'Unite8 Sports 1' व 'Unite8 Sports 1 HD' आणि इंग्रजीत 'Unite8 Sports 2' व 'Unite8 Sports 2 HD' ही चॅनेल्स बाजारात आणली आहेत. भारतीय वेळेनुसार, बहुतांश सामने मध्यरात्रीनंतर सुरू होणार आहेत. वेळेतील या फरकामुळे भारतीय प्रसारक यामध्ये फारशी उत्सुकता दाखवत नव्हते, हा एक मोठा अडथळा होता. यापूर्वी २०२२ मध्ये कतार येथे झालेला फिफा विश्वचषक भारतासाठी अनुकूल वेळेत होता, त्याचे प्रक्षेपण हक्क व्हायकॉम१८ (Viacom18 - जो आता जिओस्टारचा भाग आहे) ने ६२ दशलक्ष डॉलर्सला खरेदी केले होते.

FIFA World Cup 2026 India broadcast
Sunil Gavaskar | 'शतकासाठी स्वार्थी व्हावे लागले असते'; संजू सॅमसनच्या रिॲक्‍शनवर सुनील गावस्‍कर म्‍हणाले, "संयम नेहमीच.."

जिओस्टारने लावले होते २० दशलक्ष डॉलर्स मूल्‍य

रॉयटर्सने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, फिफाने सुरुवातीला २०२६ आणि २०३० च्या विश्वचषकांचा समावेश असलेल्या 'भारत पॅकेज'साठी सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती; मात्र, त्यानंतर त्यांनी आपली ही मागणी ६० दशलक्ष डॉलर्सपर्यंत कमी केली.चीनमध्ये याचे हक्क घेणाऱ्या 'चायना मीडिया ग्रुप'ने आगामी आवृत्तीसाठी ६२ दशलक्ष डॉलर्स मोजल्याचे समजते. जिओस्टारने २०२६ च्या फिफा विश्वचषकाचे मूल्य २० दशलक्ष डॉलर्स लावले होते, जे फिफाला मान्य नव्हते. आता झालेल्‍या व्‍यवहाराबाबत आर्थिक तपशील उघड करण्यात आले नाहीत. झी एंटरटेनमेंटने (ZEEL) गेल्या वर्षीच क्रीडा प्रसारण क्षेत्रात पुन्हा उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. आठ वर्षांपूर्वी त्यांनी आपली स्पोर्ट्स चॅनेल्स 'कल्वर मॅक्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड'ला (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे कॉर्पोरेट नाव) विकली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news