Night Owls More Intelligent Study: लवकर झोपावे लवकर उठावे... याला छेद देणारा अभ्यास; उशिरा उठणारी मुले निघाली बुद्धीमान?

Night Owls More Intelligent Study
Night Owls More Intelligent Studypudhari
Published on
Updated on

Night Owls More Intelligent Study: २००९ मध्ये पब्लिश झालेल्या एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता. हा अभ्यास संतोशी कनझावा आणि केजा पेरिना यांनी केला होता. त्यांनी राष्ट्रीय लाँजिट्युडनल स्टडी ऑफ ओडलसेंट हेल्थ (ADD Health) च्या डेटाचे विश्लेषण केले होते. त्यात त्यांना जी मुले त्यांच्या बालपणात रात्री जास्त अॅक्टिव्ह असतात त्या मुलांचा बुद्ध्यांक हा उच्च असतो असं आढळून आलं.

Night Owls More Intelligent Study
Psychology Study : बॉडी लँग्वेज की शब्द, खोटेपणा कसा ओळखाल? संशोधन काय सांगते?

रिसर्चर्सनी मोठे आणि अमेरिकेच्या तरूणांचा राष्ट्रीय स्तरावरील सॅम्पलचा अभ्यास केला. यात ADD हेल्थ अभ्यासात सुरूवातीला २० हजार ७४५ किशोरवयीन मुलांचा १९९४ - ९५ मध्ये अभ्यास करण्यात आला. त्यानंतर २००१ -०२ मध्ये त्यातील १५ हजार १९७ जणांचा पुन्हा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय १८ ते २८ दरम्यान होतं. संशोधकांनी या ग्रुपचा बालपणीच्या बुद्ध्यांकासोबतच झोपेच्या पॅटर्न आणि सवयींचा अभ्यास केला.

Night Owls More Intelligent Study
AI Brain Aging Study : मेंदूच्या वेगवेगळ्या भागांच्या वयाचा अंदाज बांधणारे ‘AI’ तंत्रज्ञान विकसित, नवीन संशोधनात काय आढळलं?

या अभ्यासात संशोधकांना लहाणपणीचा बुद्ध्यांक आणि नंतरच्या वयातील त्यांच्या झोपेच्या सवयीचा एक संबंध आढळून आला. ज्या लोकांचा लहाण असताना बुद्ध्यांक जास्त होता ते रात्री उशिरापर्यंत जागत होते आणि उशिरा उठत होते. हा त्यांचा पॅटर्न वीक डे मधला होता. संशोधकांनी लहाणपणीचा बुद्ध्यांक आणि रात्रीच्या अॅक्टिव्हिटीच्या तीन ते चार गोष्टींचा अभ्यास केला.

Night Owls More Intelligent Study
Brain Study : मेंदू कसा घेतो निर्णय? नव्‍या संशोधनाने जुन्‍या सिद्धांताला छेद!

या अभ्यासातील बुद्ध्यांकच्या (IQ) विविध श्रेणींमध्ये स्पष्ट फरक दिसून आला. बालपणात ७५ पेक्षा कमी बुद्ध्यांक (IQ) असलेले म्हणून वर्गीकृत केलेले सहभागी, त्यांच्या तरुणपणात आठवड्याच्या दिवशी (Weeknights) साधारणपणे रात्री ११:४१ वाजता झोपत असत. याउलट, १२५ पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेले आणि "अत्यंत हुशार" (Very bright) म्हणून वर्गीकृत केलेले सहभागी रात्री १२:२९ च्या सुमारास झोपायला जात असत. संशोधकांना असेही आढळले की, हा अत्यंत हुशार गट विशेषतः वीकेंडला उशिरा उठतो.

वयाची अट, लिंग, वंश, वैवाहिक आणि पालकत्वाची स्थिती, शिक्षण, उत्पन्न, धर्म, सहभागी विद्यार्थी आहेत की नाही आणि ते दर आठवड्याला किती तास काम करतात, यांसारख्या झोपेच्या पद्धतीवर परिणाम करू शकणाऱ्या विविध घटकांचा विचार केल्यानंतरही हा निष्कर्ष कायम राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news