पुढारी वृत्तसेवा
युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समथच्या संशोधनानुसार, देहबोली (body language)वरून खोटेपणा ओळखण्याची शक्यता केवळ ५४% इतकीच असते.
देहबोलीवरून समोरच्याचे सत्य किंवा असत्य ओळखणे शास्त्रोक्तदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याचे मानसशास्त्रज्ञ सांगतात.
अमस्टरडॅम विद्यापीठाच्या २०२३ मधील संशोधनानुसार, देहबोलीऐवजी केवळ शब्दांवर लक्ष दिल्यास खोटेपणा ८०% अचूकतेने पकडता येतो.
खोटे बोलणारा नजर चुकवतो या लोकप्रिय कल्पनेला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
चौकशीदरम्यान खरे बोलणारे लोकही घाबरू शकतात, त्यामुळे केवळ अस्वस्थतेवरून कोणालाही खोटा ठरवणे चुकीचे आहे.
खरे बोलणार्यांना 'सत्य समोर येईल' असा विश्वास असतो, तर खोटे बोलणारे आपली पत जपण्यासाठी साधीच गोष्ट सांगतात.
एफबीआय आणि लंडन गिल्डहॉल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, गुप्त पुराव्यांच्या आधारे खोटे बोलणाऱ्यांचा विरोधाभास उघड केला जातो.
'कॉग्निटिव्ह क्रेडिटेबिलिटी असेसमेंट' (CCA) पद्धतीत मेंदूवर ताण देऊन व्यक्तीच्या विधानाचा दर्जा आणि सत्यता तपासली जाते.
माणसाच्या मनातील विचार वाचणारे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने 'लाय डिटेक्टर' पेक्षा शब्दांचे विश्लेषण करणे अधिक प्रभावी ठरते, असे संशोधन सांगते.