Brain Study : मेंदू कसा घेतो निर्णय? नव्‍या संशोधनाने जुन्‍या सिद्धांताला छेद!

पुढारी वृत्तसेवा

मानवी मेंदूची गुंतागुंतीची रचना पूर्णपणे समजून घेणे हे विसाव्या शतकातील १४ मोठ्या आव्हानांपैकी एक मानले जाते.

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनाने मेंदूच्या निर्णय क्षमतेबाबतचे जुने सिद्धांत मोडीत काढले आहेत.

आपण विचार करतो त्यापेक्षाही खूप आधी मेंदूत निर्णयाची प्रक्रिया सुरू होते, असे या अभ्यासात समोर आले आहे.

मेंदूतील प्राथमिक भाग केवळ माहिती पुढे पाठवत नाहीत, तर उच्च स्तरांकडून येणाऱ्या 'फीडबॅक लूप्स'द्वारे दोन्ही दिशांनी संवाद साधतात.

प्राध्यापक युरी व्लासोव्ह यांच्या नेतृत्वाखालील हे महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध 'PNAS' मासिकात प्रकाशित झाले आहे.

उंदरांवर केलेल्या प्रयोगात मेंदूच्या सुरुवातीच्या 'S1' भागातही निर्णयाशी संबंधित महत्त्वाच्या हालचाली नोंदवल्या गेल्या.

आजवर मानल्या गेलेल्या मेंदूतील एकाच दिशेने होणाऱ्या माहिती प्रक्रियेच्या कल्पनेला या नव्या अभ्यासाने पूर्णपणे छेद दिला आहे.

आपला मेंदू एआयच्या तुलनेत अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून अतिशय कठीण निर्णय सहज आणि वेगाने घेतो.

आता मेंदूतील या जलद सिग्नल्सच्या वेळेचा अधिक बारकाईने अभ्यास करून नवीन एआय आर्किटेक्चर तयार करण्‍यास मदत होणार आहे.

येथे क्‍लिक करा.