

Starlink in India
वॉशिंग्टन : मागील दोन दशकं मोबाईल फोन आणि टॉवर्स यांचे नाते कायम आहे. मात्र आता मोबाईल फोन वापरासाठी टॉवर्सची गरज उरणार नाही. कारण एलन मस्क यांची 'स्टारलिंक' कंपनी जून २०२७ पर्यंत एक खास तंत्रज्ञान आणणार आहे. ही कंपनी अवकाशात १,२०० नवीन उपग्रह सोडणार असून, भविष्यात मोबाईलला रेंज मिळण्यासाठी कोणत्याही टॉवरची गरज उरणार नाही. तुम्ही थेट उपग्रहाच्या मदतीने फोनवर बोलू शकाल, मेसेज पाठवू शकाल आणि इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकणार आहात.
"एलन मस्क यांची 'स्टारलिंक' कंपनी २०२७ मध्ये भारतात आपली खास उपग्रह सेवा (Satellite Service) सुरू करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या परिषदेत कंपनीने स्पष्ट केले की, २०२७ मध्ये ते अवकाशात नवीन उपग्रह सोडणार आहेत. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, मोबाईलला नेटवर्क नसले तरीही तुम्ही थेट उपग्रहाच्या मदतीने फोनवर बोलू शकाल. दुर्गम भागात किंवा जिथे टॉवर नाही, तिथेही फोनला सहज रेंज उपलब्ध होणार आहे.
स्पेसएक्स कंपनीचे उपाध्यक्ष मायकेल निकोल्स यांनी स्पष्ट केले आहे की, कंपनी २०२७ च्या जून महिन्यापासून आपले नवीन उपग्रह अवकाशात सोडायला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला साधारण १,२०० लहान उपग्रह एकामागून एक अवकाशात पाठवले जातील, ज्यामुळे हे खास नेटवर्क खूप वेगाने कार्यान्वित होईल."
स्टारलिंकचे अधिकारी निकोल्स यांच्या मते, या नवीन तंत्रज्ञानाचा उद्देश ग्राहकांना जमिनीवरील मोबाईल नेटवर्कसारखीच उत्तम कनेक्टिव्हिटी देणे हा आहे. सध्या स्टारलिंकचे ६०० उपग्रह या सेवेसाठी सज्ज असून भविष्यात ही संख्या ९,००० च्या वर जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे युजर्स थेट उपग्रहाच्या मदतीने फोनवर बोलू शकतील, मेसेज करू शकतील आणि इंटरनेटही वापरू शकतील. जिथे मोबाईलचे टॉवर नाहीत किंवा अजिबात नेटवर्क मिळत नाही, अशा दुर्गम भागातही आता सहज संपर्क साधता येईल."