Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor: छट पूजा, बिहारी महिलांच्या सिंदूर लावण्याचा पद्धतीवर 'अश्लील' बोलणं कॉमेडियनला भोवलं; दिल्लीत FIR

कॉमेडियन यश महेश्वरीवर बिहारच्या महिलांच्या सिंदूर लावण्याच्या पद्धतीवर आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप होता.
Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor
Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoorpudhari
Published on: 
Updated on: 

Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor: स्टँड अप कॉमेडियन यश महेश्वरी यांच्याविरूद्ध दिल्लीच्या साकेत पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे. पोलिसांनी एका आक्षेपार्ह व्हिडिओवरून ही एफआयआर दाखल केली असून या व्हिडिओत यश बिहारच्या महिलांचा आणि छट पुजेशी निगडीत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेविरूद्ध टिप्पणी करताना दिसतोय.

कॉमेडियन यश महेश्वरीवर बिहारच्या महिलांच्या सिंदूर लावण्याच्या पद्धतीवर आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप होता. आता तक्रारदार निलोटपाल मृणाल यांनी महेश्वरीविरूद्ध कॉमेडी इव्हेंटमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor
Bihari Laborer Death | सावंतवाडीतील बिहारच्या कामगाराच्या मृत्यूचे गूढ उकलले; नैराश्यातून गळा कापून आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

व्हिडिओ रेकॉर्डिंग, डिजीटल पुरावे सादर

तक्रारीत मृणाल यांनी, '२४ ऑक्टोबर रोजी साकेत येथील कॉमेडी क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात महेश्वरी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती असा आरोप केला आहे. तक्रारदाराने याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, सोशल मीडिया पोस्ट आणि दुसरे डिजीटल पुरावे देत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच कॉमेडियन यश माहेश्वरी, कार्यक्रम आयोजक आणि कॉमेडी क्लबविरूद्ध देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी बीएनएस कलम ७९, १९६, २९६ आणि ३५२ अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor
Thane lake pollution : सर्वपित्री अमावस्येच्या विधी, छट पूजेमुळे ठाण्यातील तलाव प्रदूषित

छट पूजेचा अपमान

यश माहेश्वरीने युट्यूब चॅनलवर Morally Questionable नावाने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी असल्याचे सांगितलं. तसेच आपण दिल्ली एनसीआरमध्ये शो करणार असल्याचं देखील सांगितलं. व्हिडिओच्या एका भागावरून वाद निर्माण झाला आहे.

Yash Maheshwari FIR Bihari Women Sindoor
‘अरे छट… हा तर टोमणा बॉम्ब’; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

यात छट पूजेदरम्यान बिहारी महिला नाकापासून केसाच्या भांगापर्यंत लांब सिंदूरची रेष ओढतात, या परंपरेवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं. त्यांनी या परंपरेची अश्लील पद्धतीने टर उडवली होती. यशच्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक युजर्सनी बिहार पोलीस आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याची दखल घण्याची आणि कारवाई करण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.