Southwest Monsoon: मान्सून पुढे सरकला, बंगालचा उपसागर, ईशान्य भारताचा भाग व्यापला

Southwest Monsoon
Southwest Monsoon

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून दोन दिवस आधीच गुरुवारी (दि.३० मे) केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सूनचा वेग अधिक असून तो वेगाने पुढे सरकत आहे. आज (दि.३१ मे) मान्सून आणखीन थोडा पुढे सरकला असून सध्या मान्सूनने बंगालचा उर्वरित भाग आणि ईशान्य भारताचा आणखी काही भाग व्यापला (Southwest Monsoon) आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Southwest Monsoon: 'या' भागात मान्सून पुढे सरकला

आयएमडीने X पोस्टमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून ईशान्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा उर्वरित भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्रात

नैऋत्य मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप क्षेत्र, केरळ, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकरणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनच्या दोन्ही शाखा एकाचवेळी सक्रिय

मान्सूनच्या दोन्ही शाखा एकाचवेळी अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि पुणे याठिकाणी २ जूनच्या सुमारास मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिणेकडील मान्सूनच्या हालचालींना वेग असल्याने गोवा (५ जून), दक्षिण सिंदुधुर्ग (दि.६ जून), पुणे (१० जून) आणि मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल होण्याची अंदाज पुणे हवामान विभागाचे निवृत्त विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी एक्स पोस्टवरून सांगितले आहे.

हेही वाचा: 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news