National Herald Case : मोठी बातमी | राहुल, सोनिया गांधींसह ६ जणांना कोर्टाची नोटीस

ईडीने दाखल केलेल्या आरोपत्राची कोर्टाकडून दखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
National Herald Case
राहुल, सोनिया गांधींसह ६ जणांना न्यायालयाची नोटीसFile Photo
Published on
Updated on

दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने शुक्रवारी (दि.२) लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना नोटीस बजावली. काँग्रेसच्या निकटवर्तीयांसह इतर ६ जणांनादेखील नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार असल्याचेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.

National Herald Case
नॅशनल हेराल्ड प्रकरण : राहुल गांधी चौकशीसाठी आज पुन्हा ED कार्यालयात दाखल

काँग्रेसच्या 'या' निकटवर्तीय यांना देखील नोटीस

विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) विशाल गोगणे यांनी सॅम पित्रोदा, सुमन दुबे, सुनील भंडारी, मेसर्स यंग इंडिया आणि मेसर्स डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड यांनाही नोटीस बजावली आहे. न्यायाधीश गोगणे म्हणाले की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या आरोपपत्रात ज्यांची नावे दिली आहेत, त्यांना नोटीस बजावताना सुनावणी घेण्याचा अधिकार आहे.

National Herald Case
नॅशनल हेराल्ड प्रकरण : भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची देशव्यापी मोहीम

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरण हे काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डचे मालक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांना ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात 'यंग इंडियनला दिलेल्या ९० कोटी रुपयांच्या कर्जाशी संबंधित आहे. एका इक्विटी व्यवहारात २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मालमत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या खाजगी तक्रारीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि गांधी कुटुंबाच्या नियंत्रणाखालील यंग इंडियनवर फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासघात आणि मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. ईडीने या वर्षी १५ एप्रिल रोजी गांधी कुटुंबासह काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि इतरांविरुद्ध खटला दाखल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news