

नवी दिल्ली: पोटाच्या विकारावरील उपचारानंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १५ जूनपासून त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉ. अजय स्वरूप यांच्या मते, ७८ वर्षीय सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, रविवारी रात्री ९ वाजता पोटाशी संबंधित विकारासाठी त्यांना सर गंगाराम रुग्णालयाच्या सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी निवेदन जारी करुन सांगितले होते. चार दिवसांपासून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. या अगोदर ९ जून रोजी, सोनिया गांधी यांची सर गंगाराम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.