Sonam Wangchuk Letter To Hospital: 'संसद' मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी सोनम वांगचुक यांचे सफदरजंग हॉस्पिटल प्रशासनाला पत्र

Sonam Wangchuk Letter To Hospital
Sonam Wangchuk Letter To Hospitalpudhari
Published on
Updated on

Sonam Wangchuk Letter To Hospital: शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि उत्तरदायित्वासाठी उपोषणावर बसलेले प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या (Safdarjung Hospital) संचालकांना एक हस्तलिखित पत्र लिहिले आहे. आज कॉक्रोज जनता पार्टीकडून चलो संसद हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आपली तात्पुर्ती सुटका करावी अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली आहे.

Sonam Wangchuk Letter To Hospital
CJP Parliament March: सरकारने अखेर कॉक्रोज जनता पार्टीची घेतली दखल... संसदेवर मोर्चा सुरू होण्यापूर्वी CJP ने केले मोठा दावा

मला हॉस्पिटलमधून तात्पुरती रजा द्या

सोनम वांगचुक यांनी आज २० जुलै रोजी २०२६ रोजी आयोजित चलो संसद या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हॉस्पिटलकडे पत्र लिहून तात्पुरत्या सुटकेची मागणी केली आहे.

सोनम वांगचुक आपल्या पत्रात म्हणतात, 'माझी तब्येत आज खूप चांगली आहे आणि माझे सर्व आरोग्य निकष (Health Parameters) सामान्य आहेत. त्यामुळे मला आज सकाळी होणाऱ्या 'संसद चलो' (March to the Parliament) आंदोलनात सहभागी होता यावे, यासाठी मला हॉस्पिटलमधून किमान तात्पुरती रजा देण्यात यावी, ही विनंती. मी आपला अत्यंत आभारी राहीन.'

Sonam Wangchuk Letter To Hospital
CJP Parliament March: जंतर मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक; आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा व्हिडिओ

पत्र मिळाल्याची पोचपावती

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने हे सोनम वांगचुक यांचे हे हस्तलिखित पत्र स्विकारल्याची आणि त्यावर रिसिव्ह असे म्हणत स्वाक्षरी नोंदवल्याचे दिसत आहे. हे पत्र प्रशासनाकडून सकाळी ११ वजून ५ मिनिटांनी स्विकारलं आहे.

सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी पोलीस प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बळजबरीने सफदरजंग रूग्णालायत दाखल केलं होतं. त्यानंतर त्यांनी रूग्णालायत आपले आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना प्रशासनाने आंदोलन स्थाळावरून उचलून नेल्यावर आजचा संसदेवरील मार्च होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र अभिजीत दिपके हे उपोषणाला बसले अन् आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं.

Sonam Wangchuk Letter To Hospital
CJP Protest: कॉकरोच जनता पार्टी आता संसदेवर धडकणार; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढणार मोर्चा

आज सकाळी सरकारकडून सीजेपीशी चर्चासाठी दार उघडल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर आता सीजेपीच्या काही नेत्यांसोबत जेपी नड्डा हे चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चलो संसद आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संसदेकडे जाणारे सर्व मार्ग ब्लॉक केले असून या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news