Sonam Wangchuk House Arrest : सोनम वांगचुक ६० दिवसांसाठी नजरकैदेत, लेहच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केला आदेश जारी

कोणत्याही रॅली किंवा मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई
Sonam Wangchuk Delhi protest warning
सोनम वांगचुक Pudhari
Published on: 
Updated on: 

Sonam Wangchuk House Arrest : शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सोनम वांगचुक यांना ६० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही रॅली किंवा मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. लेहच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.

आदेश ६० दिवसांपर्यंत कायम राहणार

लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेच्या (LAHDC) निवडणुकांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सोनम वांगचुक आणि इतर स्थानिक नेत्यांनी या निवडणुकांच्या वेळेला विरोध दर्शवला आहे. पोलीस अहवालाच्या आधारे प्रशासनाने हे निर्बंध लादण्याची विनंती केली होती. दंडाधिकाऱ्यांनी 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १६३ चा वापर करून वांगचुक यांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. आदेशात म्हटले आहे की, "हा आदेश त्वरित प्रभावाने लागू होईल आणि ६० दिवसांपर्यंत कायम राहील."

Sonam Wangchuk Delhi protest warning
Sonam Wangchuk:'अरुणाचल'च्या सुरक्षेचा मुद्दा मांडल्यामुळे प्रशासन सूडबुद्धीने कारवाई : सोनम वांगचुक यांचे राष्ट्रपतींना पत्र

सोनम वांगचुक यांची मागणी काय?

२०१९ मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतरची प्रथमच लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेची निवडणूक होत आहे. सोनम वांगचुक आणि स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे की, डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये प्रचंड थंडी असते आणि अनेक लोक विशेषतः विद्यार्थी आणि कामगार काही काळासाठी इतरत्र स्थलांतरित होतात. परिणामी, या काळात निवडणुका घेतल्यास हजारो मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात.

Sonam Wangchuk Delhi protest warning
Sonam Wangchuk : 'प्रत्येकाने एकदा तरी तुरुंगात जायला पाहिजे', गुन्हा केल्याबद्दल नव्हे, तर...

प्रशासनाने केले निर्णयाचे समर्थन

लडाखचे मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी हिवाळ्यात निवडणुका घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्‍हटलं आहे की, प्रशासन मतदान केंद्रांवर हिटरची व्यवस्था करेल आणि वृद्धांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करेल. लडाखमध्ये शाळा साधारणपणे १५-१६ डिसेंबरपर्यंत सुरू असतात. मुले या हवामानात शाळेत जाऊ शकतात, तर प्रौढांना मतदानासाठी बाहेर पडण्यात कोणतीही अडचण येऊ नये. परिषदा वेळेवर गठित होणे आवश्यक आहे, कारण नवनिर्वाचित संस्था जानेवारी ते मार्च दरम्यान आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करू शकतील."

Sonam Wangchuk Delhi protest warning
Sonam Wangchuk : "संकटात साथ दिली, अन् आता..." ; निवडणूक आयुक्तांविरोधात CJPच्‍या आंदोलनाबाबत सोनम वांगचुक काय म्‍हणाले?

सोनम वांगचुक काय म्हणाले?

हा आदेश जारी होण्यापूर्वीच, सोनम वांगचुक यांनी माहिती दिली की, त्यांना नजरकैदेत (हाऊस अरेस्ट) ठेवण्यात आले असून, त्यांच्या घराभोवती डझनभर पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यांनी सांगितले, "मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. माझ्या घराभोवती डझनभर सशस्त्र रक्षक तैनात आहेत. सरकारचा दावा आहे की मला घरीच राहण्याचा 'सल्ला' देण्यात आला आहे. मी काही महत्त्वाचे आणि थेट प्रश्न उपस्थित केले, म्हणूनच हे घडले आहे."

Sonam Wangchuk Delhi protest warning
Sonam Wangchuk : "लडाखमध्ये घडतंय ते चीन तिबेटमध्येही करत नाही"; वांगचुक यांच्या वक्तव्याने नवा वाद, तिबेट सरकार आक्रमक

८ परिषदांमधील १०० जागांसाठी निवडणुका

नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लेह आणि कारगिल या दोन्ही ठिकाणच्या जागांची संख्या प्रत्येकी २६ वरून ५० करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, एकूण ८ परिषदांमधील १०० जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील ३६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे; १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होईल आणि उमेदवार २० नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतील. ४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. लडाखमधील १९२ पंचायतींपैकी ५५ सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित १३७ जागांसाठी मतदान होणार आहे. यासोबतच, लेह नगरपालिकेच्या २१ प्रभागांसाठी आणि कारगिलमधील १७ प्रभागांसाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे (येथील ४ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.