Abhijeet Dipke Hunger Strike: अभिजीत दिपके आमरण उपोषण करणार... सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलल्यानंतर घेतला मोठा निर्णय

Abhijeet Dipke
Abhijeet DipkeFile Photo
Published on
Updated on

Abhijit Dipke Hunger Strike: दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलीसांनी उचलून नेलं आहे. त्यानंतर आता कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ते स्वतः आमरण उपोषणावर बसणार आहेत असं जाहीर केलं आहे.

Abhijeet Dipke
Sonam Wangchuk: 'पोलिसांनी मारहाण केली आणि...', अभिजीत दीपकेने पोलिसांवर केले गंभीर आरोप, काय घडलं जंतर-मंतरवर?

दरम्यान, कॉक्रोज जनता पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रूग्णालयात दाखल केल्यावर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके हे आता आमरण उपोषण करणार असून २० जुलै रोजी चलो संसद हा मोर्चा जसा ठरला होता तसा तो होणार आहे अशी देखील माहिती देण्यात आली आहे.

Abhijeet Dipke
Abhijeet Dipke: 'आता नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणार'; वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक

जंतर मंतरवर नेमकं काय झालं?

दिल्ली पोलिसांनी आज सकाळी जंतर मंतरवरून सोनम वांगचुक यांना हटवून सफदरगंज रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना उचलून गेण्यात आलं. न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आलं. त्यांची प्रकृती पाहून त्यांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं सांगण्यात आले.

Abhijeet Dipke
Sonam Wangchuk Strike: 'मी शरीराने अशक्त, पण मनाने खंबीर'; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस, प्रकृती चिंताजनक

परवानगीशिवाय उपचार नको

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी माझ्या परवानगीशिवाय सोनम यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात येऊ नयेत असं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकीय व्यक्ती सेलिब्रेटी यांनी सोनम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर तिथं लोकांची गर्दी वाढत होती. तेवढ्यात आज दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news