प्रज्वलने मोलकरणीच्या मुलीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले

Prajwal Revanna | दोषारोपपत्रात SIT चा खुलासा
Prajwal Revanna
प्रज्वल रेवण्णांविरुद्ध दोषारोपपत्र दारवलfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्याविरुद्ध १२३ साक्षी नोंदविण्यात आला असून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रेवण्णा यांनी हासनच्या होळेनरसीपूर येथे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचे आरोप पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार प्रज्वलने मोलकरणीच्या मुलीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले होते. याशिवाय फोन कॉलवर तिचे अश्लील फोटो काढणे आणि पुरावे नष्ट केल्याचेही समोर आले आहे.

प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) हे सध्या कारागृहात असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्यांच्याविरुद्धच्या पहिल्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात होळेनरसिपूर पोलिस स्थानकात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने एच. डी. रेवण्णा यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली होती. पीडित महिलेच्या मुलाने रेवण्णा पिता-पुत्रांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली आहे. धमकावून लैंगिक शोषण करण्यात आल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.

आरोपपत्रानुसार, प्रज्वलविरुद्ध (Prajwal Revanna) खटला समोर आल्यावर त्यांनी व्हिडिओ आणि फोटो नष्ट केले आणि परदेशात पळून गेले. मात्र, एफएसएलच्या मूळ अहवालातून तपास पथकाने फोटो आणि व्हिडिओ जप्त केले. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात घटनास्थळावरील तपासणी, वैज्ञानिक, मोबाईल, डिजिटल आणि इतर संबंधित पुराव्यांचा समावेश आहे. पहिला गुन्हा माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचा मुलगा आमदार एचडी रेवन्ना यांच्यावर त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका मोलकरणीच्या तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आला होता. पीडिता ही आमदार पत्नी भवानी हिचीही नातेवाईक होती. तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे.

Prajwal Revanna
संतापजनक : ४५ वर्षाच्या पुरूषाचा १५ वर्षीय मुलीवर अत्याचार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news