ठार मारण्याची धमकी देऊन ४५ वर्षीय इसमाने १५ वर्षीय मुलीचे शारीरिक शोषण केले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मनिष असे या आरोपीचे नाव आहे. (संतापजनक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी नववीच्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील खासगी काम करतात. मनीष एका कंपनीत चालक आहे. १२ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले. त्याच्या पत्नीला मूल नाही. सदरची मुलगी आणि मनीषची ओळख होती. जुलै महिन्यात ती मुलगी मनीषच्या घरी गेली. त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. (संतापजनक)
त्यानंतर मनिषने तीला ठार मारण्याची धमकी देऊन, तो तिचे शारीरिक शोषण करू लागला. १६ नोव्हेंबरला मुलीची प्रकृती खालावली. आईने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी तिच्या आईला धक्का बसला. याबाबत आईने आपल्या मुलीला विचारणा केली असता, तिने मनीषने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली. (संतापजनक)
त्यानंतर आईने मुलीसह कळमना पोलिस स्टेशन गाठून मनिष विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
हे ही वाचा :
व्हिडिओ पहा : मेंटल हेल्थ विषयात पी.एचडी करणारा पहिला तृतीयपंथी