Shukra Gochar : शुक्र ग्रह करणार बुधाच्‍या राशीत प्रवेश; ५ दिवसांनंतर 'या' ५ राशींचा बँक बॅलन्स वाढणार!

कन्या राशीतील शुक्र प्रवेशाने काही राशींसाठी अत्‍यंत शुभ काळ सुरु होणार
Shukra Gochar 2026
Shukra Gochar 2026pudhari photo
Published on
Updated on

Shukra Gochar entering Kanya Rashi : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचे भ्रमण अत्यंत शुभ मानले जाते. धन, प्रेम आणि सौंदर्याचा कारक असलेला शुक्र जेव्हा आपली चाल बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर दिसून येतो. सध्या शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत स्थित आहे, परंतु लवकरच तो बुधाच्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या हालचालीमुळे काही राशींसाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे.

बुधाच्‍या कन्‍या राशीत करणार शुक्र ग्रह करणार गोचर

हिंदू पंचांगानुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी शुक्र कन्या राशीत गोचर करेल. बुधाच्या या राशीत शुक्र २ सप्टेंबर २०२६ पर्यंत विराजमान राहील. शुक्राच्या या राशी बदलामुळे काही राशींचे सुवर्णदिवस सुरू होणार आहेत. ज्योतिषशास्‍त्रानुसार, शुक्राचे भ्रमण कोणत्याही राशीसाठी सामान्यतः वाईट मानले जात नाही. मात्र, कुंडलीतील ग्रहांच्या विशिष्ट स्थितीनुसार शुक्र काही वेळा अशुभ फळ देऊ शकतो. तरीही, बुधाच्या कन्या राशीत होणाऱ्या या प्रवेशामुळे प्रामुख्याने ५ राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

Shukra Gochar 2026
बुध ग्रहाच्या रहस्यमय संरचनेमागे ‘हिट अँड रन’ प्रकारची घटना?
Shukra Gochar
AI Photo

वृश्चिक राशीच्‍या जातकांना गुंतवणुकीतून मोठा धनलाभ

कन्या राशीत होणारे शुक्राचे भ्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे जीवन सुख-समृद्धीने उजळून निघेल, तसेच लव्ह लाईफमध्येही रोमान्स वाढेल.

Shukra Gochar
AI Photo

मिथुन राशीच्‍या जातकांना व्‍यवसायात होईल फायदेशीर डील

मिथुन राशीच्या जातकांसाठी हे गोचर सकारात्मक बदल घेऊन येईल. व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती एखादी मोठी आणि फायदेशीर डील लागू शकते. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि घरात सुख-शांती राहील.

Shukra Gochar
AI Photo

धनु राशीच्‍या व्‍यावसायिकांना मिळणार गुंतवणुकीशी संबंधित खूशखबर

धनु राशीसाठी शुक्राचे हे भ्रमण अतिशय लाभदायक ठरेल. नवविवाहितांसाठी हा काळ शुभ मानला जात आहे. व्यावसायिकांना गुंतवणुकीशी संबंधित एखादी मोठी खूशखबर मिळू शकते.

Shukra Gochar
AI Photo

वृषभ राशीच जातकांना मिळेल कौटुंबिक सुख

वृषभ राशीच्या लोकांना या गोचरमुळे अत्यंत शुभ फळे मिळतील. कुटुंबात आनंदी आणि शांततेचे वातावरण राहील. परदेश प्रवासाचे योग बनत आहेत. जोडीदाराच्या खंबीर साथीमुळे तुम्ही कोणत्याही अडचणीवर सहज मात करू शकाल.

Shukra Gochar 2026
Astrology Predictions 2026: गुरु-मंगळ ग्रहाचे वर्चस्व, २०२६ वर्ष भारतासह जगासमोरील आव्हाने वाढविणार!
Shukra Gochar
AI Photo

मकर राशीच्‍या जातकांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ होण्‍याची संधी

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. प्रेमसंबंधात असलेल्या काही जणांच्या लग्नाला कुटुंबाची मंजुरी मिळू शकते. तसेच, उत्पन्न वाढवण्यासाठी एखादी उत्कृष्ट संधी किंवा डील मिळण्याची दाट शक्यता आहे.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news