Shocking Viral Video: तरूणाच्या डोक्यावर हातोडा मारत होता; मेंदू खात होता.... माणूस नाही तर सैतानाचा भीतीदायक Video व्हायरल

Shocking Viral Video
Shocking Viral Videopudhari
Published on
Updated on

Shocking Viral Video: मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक माणूसकीला काळीमा फासणारी घटाना घडली आहे. एका युवकाची दिवसा ढवळ्या निघृण हत्या करण्यात आली. तो नराधम इथंच थांबला नाही तर त्यानं हातोडीनं डोक्यावर वार करत त्याचं डोकं फोडलं. त्यानंतर त्याचा मेंदू खाल्ला आणि रक्तही पिलं. आजूबाजूच्या लोकांनी या भयावह घटनेचं शूटिंग केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढचा तापस सुरू केला आहे.

तरूणाचा मेंदू खाल्ला

तरूणाची निघृण हत्याकेल्यानंतर हा आरोपी त्याचं मांस खात असल्याचं दिसतं. तसेच त्यानं त्याचं रक्त देखील पिल्याचं समोर आलं आहे. रस्त्याच्या मधोमध हा सगळा प्रकार सुरू होता. कॉलनीतील काही लोकांनी हे पाहिलं अन् त्यांनी दुरून याचे शूटिंग केलं. या घटनेमुळं भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हातोड्यानं अनेक वार

हा व्हिडिओ देहात पोलीस ठाण्यातील समन्ना गावातील आहे. अर्थखेंडा गावात राहणारा युवाक भरत विश्वकर्मा हा युवत या गावात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी बाईकवरून जात होता. त्याच्या बहिणीच्या घरासमोर आल्यानंतर या आरोपी व्यक्तीनं त्याच्या डोक्यावर हातोडीनं वार केला. यामुळं तो खाली पडला. त्यानंतर आरोपीने रॉडने त्याच्यावर अनेक वार केलं.

बाल्कनीतून पाहत होते लोक

तो सैतान डोकं फोडून त्यातील मेंदू खात असताना, रक्त पीत असताना आसपासची लोकं आपल्या बाल्कनीतून हे सगळं पाहत होते. त्यांनी या सगळ्याचं शूटिंग केलं. यानंतर त्यांनी पोलिसांना याची सूचना दिली.

पोलिसांनाही लागला वेळ

दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी आरोपी खूनी तिथंच होता. मात्र त्याला पकडण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. कारण त्याच्या डोक्यात राग होता. तो गावातील लोकांवर आणि पोलिसांवर देखील हल्ला करत होता. शेवटी लोकांनी त्याला चारी बाजूंनी घेतलं पोलिसांनी त्याला पकडून अटक केली.

भरतला त्यानंतर दमोह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत भरत आणि आरोपीमध्ये कोणताही वाद नव्हता. आरोपी हा सायको असून त्यानं रागाच्या भरात हे सर्व केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळं गावातील वातावरण दहशतीचं बनलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news