Shivraj Singh vs Mohan Yadav: मध्य प्रदेश भाजपमध्ये अंतर्गत जुगलबंदी? शिवराज सिंह थेट मोहन यादव सरकारविरोधात उतरले मैदानात

भाजपला मतदान केलेल्या लोकांचीच घरे पाडताय.... शिवराज सिंह चौहान यांनी कान उपटले
Shivraj Singh vs Mohan Yadav
Shivraj Singh vs Mohan Yadavpudhari
Published on: 
Updated on: 

Shivraj Singh vs Mohan Yadav: मध्य प्रदेशातील सेहोर जिल्ह्यातील भटक्या जमातींच्या लोकांचे आंदोलन आता राज्याच्या राजधानीत पोहचलं आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यातच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सार्वजनिकरित्या या प्रकरणात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांविरूद्ध भूमिका घेतली तेही राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना शिवराज सिंह यांनी विरोधी भूमिका घेतल्याने मध्यप्रदेशात भाजपमध्ये अंतर्गत राजकीय कुस्ती सुरू झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Shivraj Singh vs Mohan Yadav
Shivraj Singh Chouhan | केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान उद्या गोव्यात

शिवराज सिंह चौहान यांच्या मतदार संघातच राडा

शिवराज सिंह चौहान यांचा मतदार संघ बुधनीमधील कोसमी गावात पाच दिवस आंदोलन केल्यानंतर कोणताही तोडगा निघाला नाही. भटक्या जामातीच्या लोकांनी यानंतर भोपाळच्या दिशेने मोर्चा काढला. त्यांनी मुख्यमंत्री मोहन लाल यादव यांच्या भेटीची मागणी केली. त्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे सादर करायची आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच त्याचे पुर्नवसन आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची घरे पाडली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील या भटक्या जमातीच्या लोकांनी केली आहे.

Shivraj Singh vs Mohan Yadav
Shivraj Singh Chouhan | महाराष्ट्रात 1 कोटी लखपती दिदी करणार : ना. शिवराजसिंह चौहान

या सर्व मागण्या घेऊन जवळपास ५००० लोकांना मोर्चा काढला होता. मात्र आता आजूबाजूच्या गावातील लोक देखील या मोर्चात सामील होत आहेत. त्यामुळे या मोर्चातील सहभागी लोकांचा आकडा हे १०००० हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

या मोर्चाबद्दल बोलताना आदिवासी नेते रमेश बरेला म्हणाले की, 'आम्हाला मुख्यमंत्र्यांनी वन विभागाने आमच्यावर कसा अन्याय केला याची दखल घ्यावी असं वाटतं. ११ ऑक्टोबरला १२ कुटुंबीयांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यांना बेघर करण्यात आलं आहे. आम्ही हे सरकार निवडून दिलं होतं. आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकून घेतील आणि आम्हाला न्याय देतील.'

Shivraj Singh vs Mohan Yadav
Shivraj Singh Chouhan: महाराष्ट्राने शेतकऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव पाठवला की नाही, कृषिमंत्र्यांनी अखेर लोकसभेत स्पष्टच सांगितले

ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांनाच...

दरम्यान, मोर्चा सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री चौहान यांनी सार्वजनिकरित्या राज्यातील भाजप सरकार आणि दोषी अधिकाऱ्यांना फैलावर गेत त्यांनी घोर अन्याय केल्याची भावना बोलून दाखवली. त्यांनी ज्या कुटुंबीयांनी भाजपला मतदान केलं त्यांनाच तुम्ही का टार्गेट करत आहात असा सवाल देखील विचारला.

शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेय सिंह चौहान यांनी देखील कोसमीला १३ ऑक्टोबर रोजी भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत भोजन देखील केलं. या भेटीने जरी त्यांचे वडील लांब असले तरी कार्तिकेयने या आंदोलनाची दखल घेतली जात आहे असा संदेश दिला.

Shivraj Singh vs Mohan Yadav
Shivraj Singh Chouhan | हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा: शिवराजसिंह चौहान

मोहन यादव यांना घ्यावी लागली दखल

शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळं मुख्यमंत्री यादव यांना या मोर्चाची दखल घेणं भाग पडलं आहे. त्यांनी राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्याकडून शिवराज सिंह यांच्याकडून टीका देखील सहन करावी लागली. ते गेल्या दोन दशकांपासून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले होते.

मोहनलाल यादव यांच्या सरकारच्या दृष्टीकोणातून हा मुद्दा राजकीय संवेदनशिलतेचा झाला आहे. कारण भाजपमधूनच त्यांच्या सरकारवर टीका होत आहे. चौहान यांनी थेट यादव यांच्यावर टिका केली नाही. त्यांनी अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचं काम करत आहात अशी टीका केली. त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी घरे पाडली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news