

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारने सात शिष्टमंडळे स्थापन केली. काँग्रेस खासदार शशी थरूर हे एका शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करत असून, सध्या ते अमेरिकेत आहेत. येथे त्यांना वॉशिंग्टन पोस्टचे जागतिक घडामोडींचे स्तंभलेखक इशान थरुर यांनी प्रश्न विचारला. ऑपरेशन सिंदूरबाबत एक मुलाने पित्याला प्रश्न विचारण्याचा हृदयस्पर्शी क्षण अनुभवताना क्षणभर शशी थरुर स्तब्ध झाले. तसेच हा माणूस आपल्या वडिलांना असे प्रश्न विचारतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
तुम्ही पश्चिम गोलार्धातील विविध देशांमध्ये गेला आहात. तुमच्या सरकारी संवादकांपैकी कोणी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा दाखवण्यास सांगितले आहे का? पहलगाम हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्तानने वारंवार नकार दिला आहे, याबाबत तुमचे काय म्हणणे आहे?", असे प्रश्न इशान थरुर यांनी शशी थरुर यांना विचारले.
ईशान, तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले याचा मला खूप आनंद आहे. हा माणूस आपल्या वडिलांना असे प्रश्न विचारतो, अशी मिश्किल टिप्पणी करत शशी थरुर म्हणाले की, आम्हाला कोणतीही पुरो मागितले नाहीत; परंतु यासंदर्भात माध्यमांनी विचारले होते. दोन किंवा तीन ठिकाणी माध्यमांनी हा प्रश्न विचारला आहे. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, भारताने खात्रीशीर पुराव्याशिवाय ऑपरेशन सिंदूर राबवलेले नाही. भारत असा देश नाही जो त्यासाठी ठोस आधार नसताना लष्करी कारवाई करेल. हा काही अचानक दहशतवादी हल्ला नव्हता. गेल्या वर्षी पाकिस्तानने २४ दहशतवादी हल्ले केले होते; परंतु त्यापैकी कोणालाशा प्रकारच्या प्रत्युत्तराची आवश्यकता नव्हती," असेही थरुर यांनी स्पष्ट केले.
आम्ही दहशतवाद्यांना पकडले किंवा त्यांना मारले, यामध्ये भारताचे कमीत कमी नुकसान झाले. खूप कमी जीवितहानी झाली. आम्ही ही मोहिम अत्यंत योग्यरित्या हाताळली. एका अत्याधुनिक, नियोजित कारवाई करण्यात आली. पाकिस्तानला कथितपणे माहित नव्हते की ओसामा बिन लादेन कुठे आहे, हे अमेरिकन विसरलेले नाही. २६/११ मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याचा पाकिस्तानने सुरुवातीला केलेला नकाराचेही स्मरण थरुर यांनी करुन दिले. यावेळी हल्लेखोरांपैकी एकाला जिवंत पकडण्यात आले. तो पाकिस्तानी नागरिक असलय्ाची ओळख पटवण्यात आली. त्याचे नाव, पत्ता आणि राष्ट्रीयत्व याची पुष्टी करण्यात आली. त्यामुळे, आम्हाला माहित आहे की पाकिस्तानचा सहभाग किती आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, या दुर्घटनेनंतर काही मिनिटांनी, रेझिस्टन्स फ्रंटने श्रेय घेतले. "रेझिस्टन्स फ्रंट कोण आहेत? ते बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या लष्कर-ए-तैयबाचे एक सुप्रसिद्ध प्रॉक्सी फ्रंट आहेत," असेही शशी थरुर यांनी स्पष्ट केले.