Indian Politicians Security News | १९ माजी मंत्र्यांना धक्का! सुरक्षा काढून घेण्याचे गृह मंत्रालयाचे पोलिसांना आदेश

गृह मंत्रालयाने १९ माजी केंद्रीय राज्य मंत्र्यांची सुरक्षा हटवण्याचे आदेश दिले आहेत, तर स्मृती इराणी यांना सहा महिन्यांची सुरक्षा मुदतवाढ देण्यात आली आहे, जाणून घ्या कारण...
Indian Politicians Security News
Indian Politicians Security Newsfile photo
Published on
Updated on

Indian Politicians Security News

दिल्ली : गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना १९ माजी राज्यमंत्र्यांचे सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यकाळ संपल्यानंतरही या मंत्र्यांकडे सुरक्षा तैनात होती. मात्र केंद्र सरकारने भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सुरक्षा सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसांच्या ऑडिटनंतर सुरक्षा काढली

दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाकडे माजी राज्यमंत्री आणि खासदारांची यादी पाठवली होती ज्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सुरक्षा कवच आहे. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा युनिटने केलेल्या ऑडिटनंतर यादी केली होती. ऑडिटमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना कार्यकाळ संपल्यानंतरही सुरक्षा असल्याचे आढळले होते. ऑडिटनंतर, अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. पुनरावलोकनात अनेक माजी राज्यमंत्री पदावर नसतानाही त्यांना अजूनही संरक्षण मिळत असल्याचे आढळले. अशा व्यक्तींची यादी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Indian Politicians Security News
SC on Reseravtion | देशात आरक्षणाचा खेळ रेल्वेसारखा झालाय : सुप्रीम कोर्टाच्‍या न्यायमूर्तींची मोठी टिप्पणी

काही खासदार आणि न्यायाधीशांची सुरक्षा काढली

या पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांना Y-श्रेणी सुरक्षा कवच देण्यात आले आहे, त्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील माजी राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा, पंचायती राजचे माजी मंत्री बिरेंदर सिंग, दळणवळणाचे माजी राज्यमंत्री देवुसिंह जेसिंगभाई चौहान, आदिवासी व्यवहाराचे माजी राज्यमंत्री जसवंतसिंह सुमनभाई भाभोर आणि परराष्ट्र व्यवहाराचे माजी राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंग यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्याव्यतिरिक्त गृहमंत्रालयाच्या यादीत काही खासदार आणि वरिष्ठ न्यायाधीशांची नावे देखील समाविष्ट आहेत. काही न्यायाधीशांसाठी सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

माजी लष्करप्रमुखांची सुरक्षा कायम

सध्याच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदीय किंवा धमकीच्या आधारावर प्रदान केलेल्या सुरक्षेचे पुनरावलोकन केले जाते. मात्र पुनरावलोकने बराच काळ घेण्यात आले नव्हते. मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गृहमंत्रालयाला त्यांच्या शिफारसी पाठवल्या. गृहमंत्रालयाचा अंतिम निर्णय काही आठवड्यांपूर्वी आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह आणि राज्यमंत्री अजय भट्ट यांची नावे देखील गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली होती, परंतु त्यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, गृहमंत्रालयाने स्मृती इराणी यांची सुरक्षा आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली ​​आहे, असे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news