Supreme Court: "न्यायाधीशांनी जरा अभ्यास करावा..." पाटणा उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

महिलेची सलवार काढणे, तिची छाती दाबणे, हा प्रकार 'बलात्काराचा प्रयत्न' नसून केवळ 'विनयभंगाचा गुन्हा' असल्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने दिला होता. यावर कठोर टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे.
Supreme Court
Supreme Courtfile photo
Published on
Updated on

Supreme Court

नवी दिल्ली: पाटणा उच्च न्यायालयाने एका महिलेला खोलीत डांबून तिची सलवार काढण्याचा प्रयत्न करणे, तिची छाती दाबणे, हा प्रकार 'बलात्काराचा प्रयत्न' नसून केवळ 'महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा' असल्याचा निर्णय दिला होता. अशा प्रकारचे निर्णय देताना न्यायाधीशांनी अधिक अभ्यास, संवेदनशीलता आणि कायद्याचा व्यापक हेतू लक्षात घ्यायला हवा, अशी कठोर टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे.

Supreme Court
Asaram Bapu : "शिक्षेला स्थगिती नाहीच, जामीनही नाही..." : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अशाच एका वादग्रस्त निर्णयावर सुरू असलेल्या स्वयंप्रेरित (सुमोटो) सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील शोभा गुप्ता आणि एच. एस. फुल्का यांनी पाटणा उच्च न्यायालयाचा हा निर्णय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

नेमकं प्रकरण काय आहे?

हे प्रकरण २००८ बिहारमधील बंका जिल्ह्यातील अमरपूर येथील 'छाया स्टुडिओं'शी संबंधित आहे. स्टुडिओ मालक हिमांशू कुमार पाठक याने फोटो काढण्याच्या बहाण्याने एका महिलेला स्टुडिओत नेले आणि तिच्या वडिलांना बाहेर थांबण्यास सांगून त्याने स्टुडिओचे दार आतून बंद करून स्वतःचे कपडे काढले, महिलेची सलवार काढण्याचा प्रयत्न केला आणि तिची छाती दाबली. महिलेच्या आरडाओरडीनंतर तिच्या वडिलांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्यांना ढकलून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचा प्रयत्न केला.

२०१३ मध्ये एका न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ सह ५११ अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र पाटणा हायकोर्टाच्या न्यायमूर्ती पूर्णैदू सिंह यांनी ही शिक्षा रद्द केली होती. पाटणा उच्च न्यायालयाने नमूद केले की, तपासातील त्रुटी, वैद्यकीय पुराव्याचा अभाव, तपास अधिकाऱ्याची साक्ष नसणे आणि स्वतंत्र साक्षीदाराने फिर्यादीची बाजू न घेणे या बाबींमुळे बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप सिद्ध होत नाही.

Supreme Court
High Court: 'हायमेन फाटलेले असणे म्हणजे बलात्कार नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही': उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news