Crime News: मित्रासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्..; वडील आणि भावाने २२ वर्षीय तरुणीची केली हत्या

मित्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबाच्या प्रतिष्ठे'च्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीची वडील आणि भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये समोर आला आहे.
father brother kill woman
father brother kill womanFile Photo
Published on
Updated on

Crime News

अहमदाबाद : मित्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबाच्या प्रतिष्ठे'च्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीची वडील आणि भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदाबादमध्ये समोर आला आहे. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सोफिया फारुक (रा. सारखेझ) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील मोहम्मद फारुक नवाबखान (५६) आणि भाऊ हाबिल फारुक (३८) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात.

father brother kill woman
Crime News : सतत 'CCTV'ची नजर अन् १-१ रुपयाचा मागितला जायचा हिशेब; ६ लाखांची सुपारी देऊन सुनेनेच काढला सासऱ्याचा काटा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोफिया जुहापुरा येथील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १२ ऑगस्टच्या रात्री हाबिलसोबत दुचाकीवरून जात असताना समृद्ध डेअरीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. या कथित अपघातात सोफियाच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पायांना गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी सोला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात हा प्रकार ‘हिट अँड रन’ असल्याचे दिसत होते. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता अपघाताची ही कहाणी बनावट असल्याचे समोर आले. संशयित आरोपींनी सोफियाला दुचाकीवरून सारखेझमधील घेळजीपुरा गावाजवळील एका निर्जन ठिकाणी नेले होते. हाबिलने आपल्या पँटमध्ये लोखंडी हातोडा लपवून नेला होता. तेथे त्याने सोफियाच्या डोक्यावर हातोड्याने तीन वेळा वार केला. या हल्ल्यात तिच्या वडिलांनीही त्याला मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोफियाचा एका तरुणासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तिचे वडील आणि भावाने तिला मारहाण केली होती. तसेच इतर तरुणांशी बोलू नको असे सांगितले होते. याच कारणावरून दोघांच्या मनात सोफियाविषयी राग निर्माण झाला आणि कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याच्या नावाखाली तिच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हत्येनंतर त्यांनी सोफियाला रस्त्यावर नेले. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा बनाव करण्यात आला. त्यानंतर अज्ञात वाहनाविरोधात खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासादरम्यान अपघाताची संपूर्ण कहाणी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी वडील-मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

father brother kill woman
Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून भावाच्या कुटुंबावर हल्ला; पिता-पुत्राला ५ वर्षे सक्तमजुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news