CJP Protest : विद्यार्थी, युवकांवरील लाठीचार्जचे फोटो-व्हिडिओ पाठवा : 'तृणमूल'च्या साकेत गोखलेंचे आवाहन

जंतर-मंतर येथील आंदोलनावेळी अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाईची तयारी
CJP Protest Jantar Mantar
CJP Protest Jantar Mantar
Published on
Updated on

CJP Protest Jantar Mantar

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित अमानुष पोलिसी मारहाणीविरोधात आता कायदेशीर लढाईची तयारी सुरू झाली आहे. आंदोलक, विद्यार्थी आणि युवकांवर झालेल्या लाठीचार्ज तसेच मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे मोठ्या प्रमाणावर पाठवण्याचे आवाहन तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनी केले आहे. गोखले यांनी काही खासदारांसोबत मिळून या घटनेचे व्हिडिओ पुरावे गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. आंदोलकांवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत.

विद्यार्थी आणि युवकांना अमानुष मारहाण झाल्‍याचा आरोप

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थी आणि युवकांवर मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचे प्रत्यक्षदर्शी पुरावे असलेले अधिकाधिक फोटो आणि व्हिडिओ नागरिकांनी पाठवावेत, असे आवाहन गोखले यांनी केले आहे. विशेषतः हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसणारे व्हिडिओ कायदेशीर कारवाईसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

CJP Protest Jantar Mantar
CJP Protest Delhi : मी माफी मागतो; CJP प्रमुख अभिजीत दीपकेंनी म्हणून मागितली आंदोलकांची माफी..

पोलिस अधिकार्‍यांची ओळख पटवणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश

आंदोलकांवर हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची ओळख पटवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करून त्यांना कायदेशीररित्या जबाबदार धरण्यासाठी हे पुरावे गोळा केले जात आहेत, असे गोखले यांनी म्हटले आहे. दरम्यान, फोटो किंवा व्हिडिओ पाठवणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. पुरावे अपलोड करण्यासाठी नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक किंवा कोणत्याही खात्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जंतर-मंतरवरील पोलिसी कारवाईचे व्हिडिओ किंवा फोटो असलेल्या नागरिकांनी ते पुढे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

CJP Protest Jantar Mantar
CJP Protest Delhi: CJPच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'पेपर लीकवर राजकारण...'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news