Sabarimala Case |'तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहात, धर्माचे नाही!' शबरीमला प्रकरणी सरन्यायाधीशांच्या पीठासमोर केंद्राचा युक्तिवाद

Sabarimala Case |'एखादी धार्मिक प्रथा अंधश्रद्धा आहे की नाही, हे धर्मनिरपेक्ष न्यायालय ठरवू शकत नाही
Sabarimala case Supreme Court
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
Published on
Updated on

Sabarimala case Supreme Court

नवी दिल्ली: "कोणत्याही धर्मातील एखादी प्रथा ही अंधश्रद्धा आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. धर्मविषयक बाबींवर निर्णय घेणे न्यायालयाच्या अधिकारकक्षेत येत नाही, कारण न्यायाधीश हे कायद्याचे तज्ज्ञ असतात, धर्माचे नाही, असा युक्तिवाद केंद्र सरकारने केला होता. या युक्तिवादाला उत्तर देताना न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रथा अंधश्रद्धेवर आधारित आहे हे न्यायालय कसे ठरवू शकणार?

सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ सध्या केरळच्या शबरीमला मंदिरासह विविध धार्मिक स्थळांवरील महिलांच्या प्रवेशाशी संबंधित भेदभाव आणि धार्मिक स्वातंत्र्याची व्याप्ती यावर सुनावणी करत आहे. आज (दि. ८) सुनावणीच्या सुरुवातीला केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सवाल उपस्थित केला की, एखादी प्रथा अंधश्रद्धेवर आधारित आहे हे न्यायालय कसे ठरवू शकणार? मेहता म्हणाले की, "समजा एखादी प्रथा अंधश्रद्धेवर आधारित आहे, तरीही ते ठरवणे न्यायालयाचे काम नाही. संविधानाच्या अनुच्छेद 25(2)(b) नुसार, सुधारणांसाठी कायदा करण्याचे काम विधिमंडळाचे आहे. संसद किंवा विधानसभा जादूटोणा विरोधी कायद्यांप्रमाणे कोणत्याही प्रथेला अंधश्रद्धा मानून त्याविरुद्ध कायदा करू शकतात."

विधिमंडळ ठरवेल तेच अंतिम असे म्हणता येणार नाही : न्‍या. अमानुल्‍ला

यावर न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, "न्यायालयाकडे एखादी प्रथा अंधश्रद्धा आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर काय पाऊल उचलायचे हे विधिमंडळ पाहू शकते, परंतु विधिमंडळ जे ठरवेल तेच अंतिम असेल, असे म्हणता येणार नाही."

Sabarimala case Supreme Court
Supreme Court| हिंदू, बौद्ध, शीख धर्मांव्यतिरिक्त अन्य धर्मांतरामुळे 'अनुसूचित जाती'चा दर्जा गमावला जातो : सर्वोच्च न्यायालय

माननीय न्यायाधीश हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत, धर्माचे नाही

सॉलिसिटर जनरल मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, "एक धर्मनिरपेक्ष न्यायालय एखाद्या धार्मिक प्रथेला अंधश्रद्धा ठरवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे धार्मिक बाबींमध्ये तज्ज्ञता नसते. माननीय न्यायाधीश हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत, धर्माचे नाही." भारतासारख्या विविधतेने नटलेल्या समाजात एका ठिकाणी जी बाब धार्मिक असते, ती दुसऱ्या ठिकाणी अंधश्रद्धा मानली जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

Sabarimala case Supreme Court
Supreme Court |सुनेशी होणारी साधी भांडणे म्हणजे क्रूरता किंवा 'हुंड्यासाठीचा छळ' नव्हे : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

... तर त्‍याला अंधश्रद्धा मानले जाणार नाही का? : न्‍या. जॉयमाल्या बागची

यावेळी न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी विचारले की, "जर जादूटोणा हा एखाद्या धर्माचा भाग असल्याचे सांगितले गेले, तर त्याला अंधश्रद्धा मानले जाणार नाही का? अशा प्रकरणात जर विधिमंडळ गप्प असेल, तर न्यायालय सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या आधारावर हस्तक्षेप करू शकत नाही का?" यावर उत्तर देताना मेहता म्हणाले की, "न्यायालय पुनरावलोकन करू शकते, परंतु ते 'अंधश्रद्धेच्या' आधारावर नाही, तर केवळ 'आरोग्य, नैतिकता आणि सार्वजनिक सुव्यवस्था' या निकषांच्या आधारावर असावे."

Sabarimala case Supreme Court
Supreme Court |'SIR'मध्‍ये अडथळा खपवून घेतला जाणार नाही! ममता बॅनर्जींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा राज्यांना कडक इशारा

दुसऱ्या धर्माच्या नजरेतून एखाद्या प्रथेला अनावश्यक ठरवता येणार नाही : न्या. नागरत्ना

वादाच्या ओघात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी सुचवले की, कोणत्याही धार्मिक प्रथेला समजून घेण्यासाठी त्याच धर्माच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. दुसऱ्या धर्माच्या नजरेतून एखाद्या प्रथेला अनावश्यक ठरवता येणार नाही. मात्र, या सर्व गोष्टी आरोग्य, नैतिकता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या अधीन असाव्यात.

Sabarimala case Supreme Court
CJI Surya Kant Angry: मला धमकी देताय.. अजूनपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही... कुटुंबियांना 'संपर्क' करणाऱ्यांवर CJI जाम भडकले

शबरीमला प्रकरणाची न्‍यायालयीन लढाई

  • सप्टेंबर २०१८ : पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने १० ते ५० वयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशावरील बंदी हटवली होती. ४:१ अशा बहुमताने हा निर्णय देताना ही बंदी बेकायदेशीर आणि असंविधानिक ठरवण्यात आली होती.

  • नोव्हेंबर २०१९: तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ३:२ अशा बहुमताने महिलांच्या भेदभावाचा हा मुद्दा मोठ्या पीठाकडे (नऊ न्यायाधीशांच्या पीठाकडे) सोपवला होता.

  • सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय धार्मिक स्वातंत्र्य आणि न्यायालयीन हस्तक्षेप यांच्यातील सीमा अधोरेखित करणारा ठरणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news