S Jaishankar : 'हेल्थ डिप्लोमॅसी'..! शॅम्पेनचा ग्लास उंचावला; पण एक घोटही घेतला नाही! एस. जयशंकर यांची 'ती' कृती ठरली लक्षवेधी

S Jaishankar Champagne Toast Video : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्‍या भेटीचा व्‍हिडिओ व्‍हायरल
S Jaishankar Marco Rubio Meeting
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ यांच्‍याबरोबर झालेल्‍या भेटप्रसंगी एस जयशंकर यांची कृती लक्षवेधी ठरली. Pudhai news
Published on: 
Updated on: 

S Jaishankar champagne toast video : भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंधांतील तणाव कायम आहे. अशातच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) मार्को रुबिओ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या वर्षातील त्यांची ही दुसरी भारत भेट आहे. यावेळी दिल्लीऐवजी मार्को रुबिओ थेट मुंबईत दाखल झाले. येथे त्‍यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. या दोघांच्‍या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. परराष्‍ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका कृतीतून एक खास संदेश दिल्याचे दिसून येत आहे.

जयशंकर यांनी दिला 'नो ड्रिंक'चा संदेश!

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे मार्को रुबिओ व सर्जिओ गोर यांची मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली. या वेळी त्यांच्या हातात शॅम्पेनचे ग्लास होते. विशेष म्हणजे, जयशंकर आणि विक्रम मिस्री यांनी रुबिओ व गोर यांच्यासोबत शॅम्पेनचा ग्लास उंचावून 'टोस्ट' केला. त्यानंतर मार्को रुबिओ यांनी शॅम्पेनचा एक घोटही घेतला; मात्र एस. जयशंकर यांनी ती शॅम्पेन ओठांनाही लावली नाही. त्यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांसोबत शिष्टाचार म्हणून 'टोस्ट' केले, पण मद्यपान न करता एक प्रकारे 'नो ड्रिंक'चा ( मद्‍यपान नको) असा संदेशच उपस्थितांना दिला.

S Jaishankar Marco Rubio Meeting
S. Jaishankar | अमेरिकेला एकमेव महासत्ता व्हायचे आहे : एस. जयशंकर

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ मंगळवारीच मुंबईत पोहोचले. 'सुपरइंटेलिजेंस'मुळे मानवतेला फायदा व्हावा आणि इंडो-पैसिफिक (हिंद-प्रशांत) क्षेत्र मुक्त व खुले राहावे, यासह अनेक मुद्द्यांवर अमेरिका आणि भारत यांच्‍यात एकमत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुंबईतील 'फ्रीडम 250' सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. पश्चिम भारतातील मुंबई आणि जामनगरच्या आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात रुबिओ सरकारी आणि व्यावसायिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यात रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचाही समावेश आहे, ज्यांची कंपनी जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठा रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते.

भारत-अमेरिका व्‍यापार करारावर साऱ्यांचे लक्ष

गेल्या काही दिवसांत मार्को रुबिओ आणि इतर अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमधील व्यापक व्यापार करार (Trade Deal) जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या दौऱ्यादरम्यान या ट्रेड डीलवर स्वाक्षरी होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, रुबिओ आणि जयशंकर यांच्यात ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य विस्तारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढता ऊर्जा व्यापार नवी दिल्लीच्या पुरवठा साखळीत (Supply Chain) विविधता आणण्यासाठी परिवर्तनकारी भूमिका बजावू शकतो, यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भर दिला. गेल्या पाच महिन्यांतील अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे.

S Jaishankar Marco Rubio Meeting
S. Jaishankar | टॅरिफवरून फक्त भारताला टार्गेट करणे अन्यायकारक

रुबिओ यांनी ताजमहाललाही दिली भेट

जयशंकर यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी रुबिओ यांनी ताजमहालाला भेट दिली, तसेच 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मृतांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहली. या भीषण हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह अनेक जण बळी पडले होते. मुंबईत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी ऊर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य यावर चर्चा झाल्याचे आणि अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याच्या महत्त्वावर भर दिल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news