Rule Change: गॅस पासून टॅक्सपर्यंत... १ डिसेंबर पासून होणार हे ५ महत्वाचे बदल

नोव्हेंबर महिना संपत आला आहे नव्या महिन्यात अनेक अर्थिक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे.
Rule Change
Rule Changepudhari photo
Published on
Updated on

Rule Change From 1 December:

नोव्हेंबर महिना संपत आला आहे नव्या महिन्यात अनेक अर्थिक बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे. या बदलांमध्ये एलपीजी गॅसपासून टॅक्स आणि पेन्शनपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे. १ डिसेंबरपासून ५ मोठी नियम बदलणार आहे.

Rule Change
Ambadas Danve On Eknath Shinde: याला म्हणतात बुडाखालील अंधार.... शिंदे, सोनिया अन् राहुल गांधींच्या एकत्र पोस्टरवरून दानवेंची बोचरी टीका

LPG गॅस सिलेंडरचे दर

सरकार सहसा एलपीजी गॅसच्या दरात १ डिसेंबरपासून बदल करते. हा बदल व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरबाबत केला जातो. नोव्हेंबर महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात बदल केले होते. १ नोव्हेंबरपासून १९ किलोग्रॅम गॅस सिलेंडरच्या दरात ६.५० रूपयांची घट करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलेंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या महिन्याच्या सुरूवातीला यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.

UPS डेडलाईन

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेंशन स्कीम (UPS) निवडण्याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहे. आधी ही तारीख ३० सप्टेंबर होती. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं nps आणि ups मधील एका पर्यायाची निवड करायची असेल तर त्याला ही निवड ३० नोव्हेंबर पूर्वी करावी लागणार आहे. १ डिसेंबरपासून या निवडीची संधी मिळणार नाही.

Rule Change
Muslim Ministers: ते आम्हाला मतदान करत नाहीत म्हणून केंद्रात मुस्लिम मंत्री नाहीत.. भाजप प्रदेशाध्यक्षांचे खळबळजनक वक्तव्य

पेंशन, लाईफ सर्टिफिकेट

ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं असतं. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबवली जाऊ शकते.

टॅक्स नियम

जर ऑक्टोबर महिन्यात तुमचा टीडीएस कापला गेला असेल तर सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S नुसार तुम्हाला त्याचे स्टेटमेंट जमा करावं लागणार आहे. याची शेवटची तारीख ही ३० नोव्हेंबर आहेत. त्याचबरोबर ज्या करदात्यांनी सेक्शन 92E अंतर्गत रिपोर्ट जमा करायचा आहे त्यांच्यासाठी देखील ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे.

Rule Change
White House Shooting: अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार कोणी केला? काय आहे अफगाणिस्तान कनेक्शन?

CNG-PNG जेट इंधन

ऑईल कंपन्या एलपीजी सोबतच सीएनजी आणि पीएनजी तसेच जेट इंधन यांच्या किंमतीत देखील प्रत्येक महिन्याला बदल करतात. नोव्हेंबर महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात देखील यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news