Muslim Ministers: ते आम्हाला मतदान करत नाहीत म्हणून केंद्रात मुस्लिम मंत्री नाहीत.. भाजप प्रदेशाध्यक्षांचे खळबळजनक वक्तव्य

राजीव चंद्रशेखर यांनी मुस्लिमांनी सातत्यानं काँग्रेसला मतदान करून त्यांच्या पदरात काय पडलं असा सवाल देखील केला.
Muslim Ministers
Muslim Ministerspudhari photo
Published on
Updated on

Muslim Ministers BJP President Rajeev Chandrasekhar Statement:

केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी केंद्रातील मुस्लिम मंत्र्यांची संख्या आणि मतदानाबाबत खळबळजनक वक्तव्य करत राजकीय चर्चेला तोंड फोडलं. कोझीकोड येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राजीव चंद्रशेखर यांनी मुस्लिम हे भाजपला मतदान करत नाहीत म्हणून केंद्रात मुस्लिम मंत्री नाहीत असं वक्तव्य केलं.

Muslim Ministers
Fraud News: पोलीसही नाहीत सुरक्षित! ट्रॅफिक पोलिसाकडूनच हफ्ता वसुलीचा प्रयत्न, अशी झाली भांडाफोड

राजीव चंद्रशेखर यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले, 'जर मुस्लिम मतदारांनी भाजपला मतदान केलं तर मुस्मिल खासदार होईल. जर खासदारच नसेल तर मुस्लिम मंत्री कसा होणार?' राजीव चंद्रशेखर यांनी मुस्लिमांनी सातत्यानं काँग्रेसला मतदान करून त्यांच्या पदरात काय पडलं असा सवाल देखील केला.

ते म्हणाले, 'काँग्रेसला मतदान करून मुसलमानांना काय मिळालं. जर ते भाजपला मतदान करणार नाही तर तुम्ही त्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा कशी करता. राजीव यांनी जर कोझीकोड मधली मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं असतं तर त्यांच्या भागातून मुस्लीम खासदार निवडून आला असता. त्यामुळं कदाचित त्यांना मंत्रीपद देखील मिळालं असतं.

Muslim Ministers
Ram Mandir Flag Row: दुसऱ्यांना लेक्चर देण्यापूर्वी.... पाकिस्तानच्या राम मंदिर ध्वजारोहण वक्तव्यावर भारताचा करारा जवाब

राजीव राजशेखर यांनी राजकीय प्रतिनिधित्व हे मतदानावर ठरतं हक्कावर नाही. राजीव यांनी आगामी निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने सेमी फायनल नाही तर फायनल आहे. केरळमध्ये भाजप सत्तापरिवर्तनच नाही तर सरकार चालवण्याची स्टाईल देखील बदलण्यासाठी उत्सुक आहे.

राजीव राजशेखर यांनी करेळमधील विकासकामांसाठी केंद्र सरकारनेच ९५ टक्के निधी दिली आहे. मात्र असं असतानाही केरळ सरकारला हा निधी योग्यरित्या वापरता आलेला नाही. केरळला आता डबल इंजीन सरकारची गरज असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

Muslim Ministers
White House Shooting: अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार कोणी केला? काय आहे अफगाणिस्तान कनेक्शन?

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं झालं आहे की केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये एकही मुस्लिम व्यक्ती मंत्री नाही. तसंच १८ व्या लोक सभा निवडणुकीत एनडीएकडून एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी मिळाली नव्हती. गेल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये मुख्तार अब्बास नक्वी हे एकमेव मुस्लिम मंत्री होते.

केरळमध्ये दोन स्तरात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका होणार आहेत. ९ डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी मतदान होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news