Shocking Incident |अरेरे दुर्दैव..! ओव्हरटेकिंगच्या वादातून गोळीबार; मॉर्निंग वॉक करणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियर यांचा हकनाक बळी

Shocking Road Rage Shooting | डेहराडूनमध्ये धक्‍कादायक घटना, वादानंतर दोन्ही बाजूंनी झाला गोळीबार
Shocking Incident
प्रतीकात्मक छायाचित्र.pudhari file photo
Published on
Updated on

Shocking Road Rage Shooting

डेहराडून : डेहराडूनमधील मसुरी रोडवर आज सकाळी ओव्‍हरटेकिंगच्‍या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले. या भीषण घटनेत निवृत्त ब्रिगेडियर व्ही. के. जोशी यांचा गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. राजपूर रोडवर दोन कार चालकांमध्ये ओव्हरटेकिंगवरून वाद झाला होता, ज्याचे पर्यवसान गोळीबारात झाले. दुर्दैवाने, सकाळी फिरायला बाहेर पडलेले लष्कराचे निवृत्त अधिकारी या गोळीबाराच्या कचाट्यात सापडले.

नेमकी घटना काय?

ही घटना सकाळी ६:५० च्या सुमारास डेहराडूनच्या राजपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जोहरी गावातील 'तुला अपार्टमेंट'जवळ दिल्ली पासिंगची एक फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ यांच्यात ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता. किरकोळ वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक चकमकीत झाले. स्कॉर्पिओमधील लोकांनी फॉर्च्युनरचा पाठलाग केला आणि गाडी थांबवण्यासाठी त्यांच्या टायरवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. स्‍थानिक पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ब्रिगेडियर व्ही. के. जोशी नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला (मॉर्निंग वॉक) बाहेर पडले होते. त्याच वेळी दोन गटांत सुरू असलेल्या गोळीबारातील एक गोळी त्यांना लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Shocking Incident
Dombivli Crime : माणुसकीला काळिमा! 'केअरटेकर' महिलेकडून सेवानिवृत्त आजींची लाखोंची फसवणूक, ५.६६ लाखांचा ऐवज लंपास

कार झाडाला धडकली, तरीही प्रवाशांना मारहाण

गोळीबारातून वाचण्यासाठी पळ काढणारी फॉर्च्युनर जोहरी गावातील शासकीय प्राथमिक शाळेजवळ अनियंत्रित होऊन रस्त्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. अपघात झाल्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत; स्कॉर्पिओमधील लोकांनी फॉर्च्युनरमधील प्रवाशांना मारहाण केली आणि गाडीचेही नुकसान केले. या हल्ल्यात फॉर्च्युनरमधील दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Shocking Incident
Crime News | 'सोलो ट्रिप' ठरली काळरात्र! नराधम टॅक्सी चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणी रात्रभर लपली जंगलात...

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

दोन वाहनामध्‍ये ओव्‍हरटेकिंगवरुन वाद झाला. बघता बघता या वादाने हिंसक वळण घेतले आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. यावेळी चाललेली एक गोळी ब्रिगेडियर व्‍ही. के. जोशी यांना लागली. दोन गाड्यांमधील लोक एकमेकांवर गोळीबार केला, असे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेबाबत डेहराडूनचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार यांनी सांगितले की, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Shocking Incident
Shocking Crime News: लाँग ड्राईव्ह वेळी झाला वाद... CA ने पत्नीचा थेट कात्रीनंच गळा चिरला... पोलिसांनी १८ तासात कसा छडा लावला?

आरोपी फरार, जिल्ह्यात नाकाबंदी

घटनेनंतर स्कॉर्पिओमधील सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली असून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news