UP News: प्रजासत्ताक दिनापूर्वी पोलिसांना मोठे यश, भाड्याच्या घरातून २५० किलो स्फोटके जप्त

Republic Day security alert: एका तरूणाने २० दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या घरातून २५० किलो स्फोटके उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहेत.
Republic Day security alert
Republic Day security alertfile photo
Published on
Updated on

Republic Day security alert

हापूर: एका तरूणाने २० दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या घरातून २५० किलो स्फोटके उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वी पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. पोलीसांनी राबवलेल्या 'ऑपरेशन सत्यापन' अंतर्गत हापूर येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

पोलीसांनी लाखो रुपये किमतीचे तयार तसेच अर्धवट तयार केलेले 'कँडल' (लग्नात वापरले जाणारे फटाके) यासह इतर साहित्य हस्तगत केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नदीम असे नाव असून तो गाझियाबादमधील फरूखनगर येथील रहिवासी आहे.

Republic Day security alert
DGP Ramachandra Rao : आधी व्हिडिओ, आता ऑडिओ! कर्नाटकच्या आयजीपींचे महिलेशी अश्लील गप्पा मारतानाचे रेकॉर्डिंग व्हायरल!

पोलीस निरीक्षक मुनीष प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 'ऑपरेशन सत्यापन' अंतर्गत नवीन भाडेकरूंची तपासणी करण्यासाठी ते पथकासह कुचेसर चौपला येथील फतेहपूर गावात पोहोचले होते. यादरम्यान, राहुल खटीक यांच्या घरात बेकायदेशीरपणे फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'कँडल' तयार केल्या जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता तिथे एकच खळबळ उडाली.

घराची झडती घेतली असता तिथे अडीच क्विंटल ड्राय कॉटन पावडर आणि लाखो रुपये किमतीचे फटाके आढळले. नदीमची सध्या चौकशी सुरू आहे. ही पावडर लग्नसमारंभात वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या कांड्या बनवण्यासाठी वापरली जाते. हे साहित्य तयार करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही पावडर कुठून आणली, याचा तपास पोलीस करत आहेत.

२० दिवसांपूर्वीच घेतले होते भाड्याने घर

तपासणीत असे समोर आले आहे की, नदीमने २० दिवसांपूर्वीच राहुल खटीक यांचे घर भाड्याने घेतले होते. राहुलने कोणत्या आधारावर नदीमला घर भाड्याने दिले, याचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

Republic Day security alert
Crime News: पोलीस निरीक्षकाची महिला कॉन्स्टेबलशी जवळीक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ; ३ लाखांचा हार, आयफोनची शौकीन अन् वेदनादायी शेवट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news