

renuka chaudhary dog row:
संसद भवन परिसरात आपल्या गाडीतून श्वान घेऊन येणाऱ्या काँग्रेस खासदार रेणुका चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. राज्यसभेत त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव आणला जाऊ शकतो. मात्र याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टोला लगावत आजकाल चर्चेचा हाच विषय झाला आहे.
दरम्यान, रेणुका चौधरी यांना आज संसद परिसरात हक्कभंग प्रस्ताव आणला जाऊ शकतो याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी एक भन्नाट उत्तर दिलं. त्या फक्त भौ... भौ... अशी प्रतिक्रिया देत पुढे निघून गेल्या.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी या आपल्या गाडीतून आपला पाळीव श्वान घेऊन आल्या होत्या. यावरून चांगलाच वाद निर्माण होत आहे. भाजपनं त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
संसदेत पाळीव प्राणी घेऊन येण्याच्या प्रश्नावर यात काही समस्या आहे. मुकं जनावर आत घेऊन येण्यात काय समस्या आहे. केवढा छोटासा आहे तो. तो काही कुणाला चावत नाही. चावणारे तर संसदेत आत बसलेत.'
दरम्यान, याच वक्तव्यावरून वाद निर्माण झाला अन् भाजप खासदार जगजंबिका पाल यांनी रेणुका चौधरींवर कारवाई करण्याची मागणी केली. पाल यांनी खासदारांना काही विशेषाधिकार मिळतात म्हणून त्याचा दुरूपयोग केला जाऊ नये असं वक्तव्य केलं.
ते म्हणाले, 'संसद हे देशाच्या धोरणांवर चर्चा करण्याचं ठिकाण आहे. इतं आपला श्वान घेऊन येणं आणि वादग्रस्त वक्तव्ये करणं हे देशाला लाज आणणारं आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई व्हायला पाहिजे.' दरम्यान, रेणुका चौधरी यांनी जे श्वान संसदेत आणलं ते श्वान त्यांनी रस्त्यात वाचवलं होतं.