

Orange Gate-Marine Drive Tunnel:
मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह अशा 9.23 किलोमीटर भुयारी मार्गाच्या कमाचा आज मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सोबत होते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे मतभेद झाले होते. आता यांची युती तुटणार का अशी चर्चा देखील सुरू होती. मात्र आजच्या कार्यक्रमावेळी दोन्ही नेत्यांनी हम साथ साथ हैं असं दाखवलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वाकांक्षी भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे याच ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात उड्डाण पुलाची संकल्पना करण्यात आली होती. मात्र त्या उड्डाण पुलासाठी जागा नव्हती. त्यामुळं तिथं ऑरेंज गेट भुयारी मार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती.
हा भुयारी मार्ग कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे हा भुयारी मार्ग ७०० प्रॉपर्टीच्याखालून आणि मेट्रो ३ च्या ५० मीटर खालून जाणार आहे. या बोगद्याचं काम हे डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र हे काम वेळेआधीच पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वरळी शिवडी आणि कोस्टल रोडने येऊन या मार्गाचा वापर करून विमानतळ पर्यंत प्रवास करता येईल.