Nuwan Thushara IPL 2026 | आयपीएलसाठी 'आरसीबी'च्‍या 'या' स्‍टार खेळाडूने क्रिकेट बोर्डालाच घेतलं अंगावर!

'ना हरकत प्रमाणपत्र' न मिळाल्‍याने घेतली न्‍यायालयात धाव
Nuwan Thushara IPL 2026
नुवान थुषारा.File Photo.
Published on
Updated on

Nuwan Thushara IPL 2026

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चा श्रीलंकन वेगवान गोलंदाज नुवान थुषारा याने 'IPL 2026' मध्ये सहभागी होण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) न मिळाल्यामुळे श्रीलंका क्रिकेट (SLC) च्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

नेमका वाद काय ?

श्रीलंकेमधील 'न्यूजवायर' (NewsWire)ने दिलेल्‍या वृत्तानुसार, थुषाराने म्‍हटलं आहे की, श्रीलंका क्रिकेटसोबतचा त्याचा करार ३१ मार्च रोजी संपला होता. तसेच, आपण करार नूतनीकरण न करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयाबद्दल बोर्डाला आधीच सूचित केले होते. तुषाराने दावा केला आहे की, सध्याची त्‍याची फिटनेस पातळी त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत जशी होती तशीच आहे. यापूर्वी कधीही एनओसी मिळवण्यात अडचण आली नव्हती. या परिस्थितीमुळे एनओसी नाकारण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत, त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

Nuwan Thushara IPL 2026
IPL 2026 | आकाश दीप आयपीएलमधून बाहेर; कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत वाढ

'केंद्रीय करार' नूतनीकरण न करण्याची इच्छा

श्रीलंका क्रिकेट बोर्डने विहित शारीरिक फिटनेस मानदंडांची पूर्तता न केल्यामुळे थुषाराला एनओसी नाकारण्यात आली होती. मात्र, आता या गोलंदाजाने आपल्याला आयपीएल खेळण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयाचे आदेश मिळवण्याकरिता याचिका दाखल केली आहे. तुषाराने आपला मध्यवर्ती करार नूतनीकरण न करण्याच्या निर्णयाबद्दलही श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळवले आहे.

Nuwan Thushara IPL 2026
RCB Controversy | बलात्काराचा आरोप असलेला यश दयाल 'आरसीबी'कडून खेळणार नाही : फ्रँचायझीचा खुलासा

९ एप्रिल रोजी होणार सुनावणी

थुशाराने आपल्या तक्रार अर्जात श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा, सचिव बंदुला दिसानायके, कोषाध्यक्ष सुजीवा गोदालियाड्डा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ॲशले डी सिल्वा यांना प्रतिवादी म्हणून नमूद केले आहे.या प्रकरणावर ९ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली असून, कोलंबो जिल्हा न्यायालय गुरुवारी यावर सुनावणी घेणार आहे.

Nuwan Thushara IPL 2026
Abhishek Sharma: 'रील्स, पार्ट्या आणि गर्लफ्रेंडमुळे सगळं...' युवराज सिंगचे वडील अभिषेक शर्मावर संतापले होते; नेमकं काय म्हणाले?

आरसीबीने थुषारावर लावली होती १.६ कोटींची बोली

२०२५ च्या हंगामात RCB ने या श्रीलंकन ​​गोलंदाजाला १.६ कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले होते. त्या हंगामात त्याने एक सामना खेळला होता. RCB संघाने IPL २०२५ चे विजेतेपद पटकावले होते. NOC मिळवण्यात अपयश आल्यास आपले मोठे आर्थिक नुकसान होईल, तसेच संधीही गमावावी लागेल, अशी माहिती त्याने न्यायालयाला दिल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news