Ramrao Wadkute Tribute |  "रामराव वडकुते यांच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान"; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील
Rajya Sabha MP Ramrao Wadkute Passes away
Rajya Sabha MP Ramrao Wadkute Passes away Pudhari
Published on: 
Updated on: 

Rajya Sabha MP Ramrao Wadkute Passes away

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वडकुते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान, समाजसेवेची बांधिलकी आणि धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी केलेले कार्य या नेत्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींनी शोकसंदेशात वडकुते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. जनकल्याणाच्या कार्यासाठी ते समर्पित होते. महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, चाहत्यांप्रती आणि हितचिंतकांप्रती आपण संवेदना व्यक्त करत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. तर उपराष्ट्रपतींनीही वडकुते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि समर्थकांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Rajya Sabha MP Ramrao Wadkute Passes away
MP Ramrao Wadkute passes away: हिंगोली जिल्ह्याचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून शोकसंदेश व्यक्त केला. वडकुते यांनी समाजसेवेत दिलेले योगदान तसेच गरीब आणि वंचित घटकांच्या सेवेला दिलेले प्राधान्य यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल, असे मोदी यांनी म्हटले. महाराष्ट्रात भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वडकुते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. राज्यसभेतील सहकारी खासदार गमावल्याची भावना व्यक्त करताना त्यांच्या अकाली निधनाने मराठवाड्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे त्यांनी म्हटले. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वडकुते सातत्याने प्रयत्नशील होते. सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि समाजाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे पवार यांनी नमूद केले.

रामराव वडकुते यांची राजकीय कारकीर्द

रामराव वडकुते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास झाला. दरम्यान, २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. २००१ ते २००४ आणि २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणूनही संघटनात्मक जबाबदारी सांभाळली. एप्रिल २०२६ मध्ये भाजपने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले. संसदेत ते गृहनिर्माण व शहरी विकास तसेच नागरी विमान वाहतूक विषयक समित्यांचे सदस्य होते. 

Rajya Sabha MP Ramrao Wadkute Passes away
Parbhani news |खा. वडकुते यांचा सत्कार; राजकीय जुगलबंदी रंगली

महाराष्ट्र सदनातील वैद्यकीय सुविधांचा मुद्दा ऐरणीवर

वडकुते यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सदनातील वैद्यकीय सुविधांचाही मुद्दा पुढे आला आहे. विनोद तावडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वडकुते यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले आणि तेथे उपचार मिळाले. मात्र, दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह हरियाणा भवन, पंजाब भवन अशा विविध राज्यांच्या भवनांमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी डॉक्टरांची सुविधा असणे आवश्यक आहे. तीन-चार भवनांमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.